नवी दिल्लीः मोटोरोलाने गेल्या वर्षी भारतात आपला स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. मोटो जी ८ प्लसच्या फोनमध्ये १ हजार रुपये कपात करण्यात आल्यानंतर या फोनची किंमत आता १२ हजार ९९९ रुपये झाली आहे.

Moto G8 Plus या स्मार्टफोनच्या फीचर्सवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येते की, या फोनमध्ये ६.३ इंचाचा फुल HD+ Max Vision डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिझॉल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. फोनचा डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा – कोर क्वॉलकॉम ६५५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. अँड्रॉयड ०.० पाय वर काम करतो. फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना शॉपिंग वेबसाइट Flipkart वरून फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. फोन दोन रंगात म्हणजेच कॉस्मिक ब्लू आणि क्रिस्टल पिंक मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here