नवी दिल्लीः चीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसचा फटका मोबाइल कंपन्यांना बसला आहे. सर्वात जास्त नुकसान हे स्मार्टफोन कंपनी अॅपलला बसले आहे. टीएफ इंटरनॅशनल सिक्युरिटी अॅनालिस्ट मिंग-ची कुओने २०२० च्या पहिल्या तिमाहीत अॅपलच्या शिपमेंटमध्ये १० टक्क्यांनी घट झाल्याचे सांगितले आहे. कुओने पहिल्या तिमाहीत ग्लोबल आयफोन शिपमेंट ३६ ते ४० मिलियन असून ती आधीच्या तुलनेत १० टक्के कमी झाली आहे.

चीनमधील करोना व्हायरसमुळे कंपनीने चीनमधील आपले कॉर्पोरेट ऑफिस, स्टोर आणि रिपेरिंग सेंटर बंद केले आहेत. चीनमधील केवळ अॅपलचे कार्यालय नव्हे तर अँड्रॉयड उत्पादनाचे कारखाने तुर्तास बंद करण्यात आले आहेत. चे सर्वात स्वस्त मॉडेल आयफोन SE2 () चे लिक्स समोर आले आहेत. आता या फोन संदर्भातील माहिती समोर आली आहे. लिक झालेले फीचर्स आयफोन SE2 ची डिझाईन आयफोन ८ () शी मिळती जुळती आहे. तसेच यात फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये टच आयडी बटन देण्यात आला आहे. आयफोन SE2 चा हार्डवेअर आयफोन ८ सारखा असणार आहे.

अॅपलने २०२० मध्ये आयफोन SE2 चे ३ आणि ४ कोटी युनिट विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. जुना आयफोन SE कमी किंमत असल्याने लोकांच्या पसंतीस उतरला आहे. तर आयफोन SE 2 जुन्या मॉडेलपेक्षा जरा महाग आहे. आयफोन SE 2 लाँच करण्यात आल्यानंतर आयफोन ८ कंपनी बंद करण्याची शक्यता असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here