नवी दिल्लीः हा स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच करण्याची तयारी सुरू आहे. या फोनचा टीझर लागोपाठ जारी करण्यात येत आहे. परंतु, एका ताज्या रिपोर्टमध्ये चे खास वैशिष्ट्ये लीक झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले, वॉटरड्रॉप नॉच, अॅक्सीनॉस ९६११ प्रोसेसर आणि ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे. फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा देण्याची शक्यता आहे. नव्या टीझरच्या माहितीनुसार, M31 मध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्याची शक्यता आहे.

91Mobiles ने गॅलेक्सी एम३१ ची सर्व खास वैशिष्ट्ये सार्वजनिक केली आहे. यात अँड्रॉयड १० वर आधारीत One UI 2.0 वर चालणार आहे. यात दोन सिम स्लॉट असणार आहे. स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले असणार आहे. स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ९६११ चा प्रोसेसर असणार आहे. हा फोन दोन पर्यायात येणार आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणार आहे. या फोनमध्ये चार रियर कॅमेऱ्याचा सेटअप असणार आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा Samsung GW1 प्रायमरी कॅमेरा असणार आहे. पाठीमागे डेप्थ सेन्सर, अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि एक मायक्रो असणार आहे. परंतु, रिपोर्टनुसार, रियर कॅमेऱ्याच्या सेटअपमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली नाही. या फोनमध्ये ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये Samsung Galaxy M30sचे जास्त फीचर्स असणार आहेत. यात केवळ रियर कॅमेऱ्याचा अपग्रेड असणार आहे. एम३०एस मध्ये तीन रियर कॅमेरे असणार आहे. यात प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सल आहे. फोनची माहिती लीक झाली असली तरी हा फोन कधी लाँच होणार याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here