नवी दिल्लीः () च्या १००W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीची आतुरतेने वाट पाहिली जात असताना शाओमीने आता 65W यूनिव्हर्सल Type-C लॉन्च केला आहे. या चार्जरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा चार्जर मोबाइलला चार्ज करण्याबरोबरच अन्य डिव्हाइसला चार्ज करू शकतो. स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट्स, Nintendo Switch आणि USB Type-C ला सपोर्टे करणार असून गेमिंग डिव्हाइसेसलाही चार्ज करू शकणार आहे. शाओमीचे हे गॅझेट आधीच्या तुलनेत खूपच मस्त आहे.

दीड तासांत फुल चार्ज

65W यूनिव्हर्सल Type-C चार्जर हा दिसायला छोटा आहे. कंपनी सध्या 65W फास्ट चार्जर सोबत USB चार्जर 65W फास्ट चार्ज व्हर्जन (2A1C) देत आहे. यात 2 यूएसबी Type-A आणि एक Type-C पोर्ट दिला आहे. त्यामुळे अनेक डिव्हाइस चार्ज करता येवू शकतो. शाओमीच्या या खास चार्जरने अॅपलचा १३ इंच MacBook Pro जवळपास १ तास ५० मिनिटात फुल चार्ज होऊ शकतो. तर १५.६ इंच डिस्प्लेचा शाओमी नोटबुक २ तास २५ मिनिटात फुल चार्ज होऊ शकतो. तसेच Type-C पोर्ट iPhone 11 सीरिजसाठी 18W फास्ट चार्जिंग उपलब्ध करू शकते.

स्मार्टफोनसाठी मस्तच

स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी शाओमीच्या या चार्जरला फार वेळ लागत नाही. Redmi K20 Pro चा स्मार्टफोन या चार्जरने चार्ज केल्यास १ तास ४० मिनिटात फुल चार्ज केला जाऊ शकतो. iPhone 11 ला चार्ज करण्यासाठी १ तास ५० मिनिटे लागतात. iPad Pro ला चार्ज करण्यासाठी २ तास ४८ मिनिटे लागतात. तर Nintendo Switch ला चार्ज करण्यासाठी २ तास ५५ मिनिटे लागतात. शाओमीचा हा चार्जर सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा सिंगल युनिव्हर्सल टाइप सी पोर्टसोबत दिला जातो. हा चीनच्या अधिकृत एमआय स्टोरवर उपलब्ध आहे. याची किंमत १२९ युआन म्हणजेच १३०० रूपये आहे. शाओमीचा हा चार्जर भारतात कधी लाँच करणार या विषयी कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here