नवी दिल्लीः () ला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. () कडून परवाना मिळाल्याने भारतात लवकरच व्हॉट्सअॅपवरून पैशांची देवाण-घेवाण करता येऊ शकणार आहे. कंपनी सर्व ग्राहकांना ही सेवा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहक आता व्हॉट्सअॅपवरूनच एकदुसऱ्याला पैसे पाठवू शकतात.

फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टँट मेसेजिंक अॅप WhatsApp ने २०१८ मध्ये या पेमेंट सेवेला बिटा टेस्टिंगच्या रुपात जवळपास १० लाख युजर्ससाठी जारी केले होते. परंतु, याला कायदेशीर मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे ही सेवा सर्व युजर्सपर्यंत पोहोचली नव्हती. परंतु, आता Business Standard च्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपला भारतात WhatsApp Pay ला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात ही सेवा १० लाख युजर्सपर्यंत पोहोचू शकते. WhatsApp Pay ला गुरुवारी NPCI कडून मंजुरी मिळाली.

ही सेवा सुरू झाल्यानंतर ती भारतातील सर्वात मोठी मोबाइल पेमेंट सेवा ठरू शकते. भारतात कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅप वापरत असल्याने ही सेवा नंबर वन होण्यासाठी व्हॉट्सअॅपला फार काही करण्याची गरज नाही. भारतात सध्या ४० कोटींहून अधिक लोक व्हॉट्सअॅपचा वापर करीत आहेत. कंपनीने WhatsApp Pay सेवेला फेब्रुवारी २०१८ मध्ये टेस्टिंग मोडवर लाँच केले होते. युजर्सकडे अॅपच्या आत एक पेमेंट चा पर्याय असणार आहे. त्यावरूनच युजर्स यूपीआयवरून घेवाण-देवाण करू शकणार आहेत. गेल्या आठवड्यात फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी तज्ज्ञ व्यक्तींना सांगितले की, व्हॉट्सअॅपला पुढील सहा महिन्यात अनेक देशात लाँच करण्यात येणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here