नवी दिल्लीः चीनची कंपनी पहिल्यांदाच स्मार्टफोन आणि फीचरफोन्समध्ये भारताचा नंबर वन हँडसेट ब्रँड बनला आहे. शाओमीने दिग्गज कंपनी सॅमसंगवर मात केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सॅमसंगन नंबर वन पदावर होती. मार्केटमध्ये ऑक्टोबर-डिसेंबर आयडीसी डेटामधून ही माहिती समोर आली आहे. शाओमीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शाओमीच्या स्मार्टफोन्सने उर्वरित सर्व स्मार्टफोन आणि फीचर फोन सेलमध्ये कंपन्यांना मागे टाकले आहे.

गेल्यावर्षीच्या चौथ्या आणि अखेरच्या तिमाहीत शाओमीचे १६ टक्के मार्केट शेअर वाढले असून ते टॉपवर आहेत. आयडीसी च्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या स्थानावर सॅमसंग तर तिसऱ्या स्थानावर जिओ आहे. या डेटामध्ये मार्केटमध्ये सध्या असलेल्या स्मार्टफोन्स आणि फीचर फोन या दोन्हीचा समावेश आहे. परंतु, शाओमीकडून अद्याप कोणताही फीचर फोन लाँच करण्यात आला नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या कंपन्याचे मार्केट शेअर किती आहेत. हे या रिपोर्टमध्ये सांगितले गेले नाही. सॅमसंग आणि रिलायन्सचे फीचर फोन्स व स्मार्टफोन्सची एकूण संख्या एकत्र केली तरी त्या संख्येपेक्षा शाओमीच्या फोनची विक्री अधिक झाली आहे, अशी माहिती शाओमी इंडियाचे मुख्य आणि ग्लोबलचे उपाध्यक्ष मनू जैन यांनी सांगितले.

२०१९ मध्ये शाओमीची वार्षिक विक्री ४३.६ मिलियन राहिली. सध्या स्मार्टफोनच्या बाजारात शाओमी नंबर वनवर आहे. २०१९ मध्ये शाओमीचे मार्केटमधील शेअर २८ टक्के राहिले. २०१८ च्या तुलनेत ते ५ टक्क्यांनी वाढले आहे. चीनपेक्षा सर्वात मोठी विक्री भारतात झाली. स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये सॅमसंगचा मार्केट शेअर २१ टक्के राहिला.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here