नवी दिल्लीः मोटोरोलाचा फोल्डेबल स्मार्टफोन 2019 बद्दल कंपनी फार उत्सूक आहे. परंतु, च्या फोल्ड चाचणीत हा फोन अपेक्षेसारखा परफॉर्म करू शकला नाही. या फोनची फोल्डिंग कॅपेबिलिटी चाचणी करण्यात आली. या फोनला साडे तीन तासांत २७ हजार वेळा फोल्ड करण्यात आले. त्यानंतर या फोन फोल्ड होत नव्हता.

फोनच्या डिस्प्लेत कोणतीही अडचण आली नाही. रिसर्चर्स टीमने फोनला मशीन बाहेर पुन्हा एकदा फोल्ड करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फोल्ड होत नव्हता. फोनला जबरदस्ती फोल्ड केले तर त्याचा हिंज डिसलोकेट झाले होते. मोटोरोलाचे विशेष कौतुक करायला पाहिजे. साडे तीन तासात २७ हजार वेळा फोल्ड केल्यानंतरही या फोनचा डिस्प्ले अगदी चांगला सुरू होता. त्याला काहीच झाले नाही. मोटो रेजरला ज्या फोल्ड मशीनमध्ये टेस्ट करायचे होते. त्यात सुरुवातीला थोडी अडचण आली होती. मशीनमधील तांत्रिक अडचण आल्याने ही चाचणी थांबवण्यात आली होती. CNET ने या चाचणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. फोल्ड बॉट मशीनला मोटो रेजरची चाचणी करण्याआधी व्यवस्थित करण्यात न आल्यानेही असे होऊ शकते, असे CNET चे होस्ट क्रिक पार्कर यांनी सांगितले.

युजर दिवसभरात फोनला ८० ते १५० वेळा चेक करतात. त्यामुळे हा फोन फोल्ड होण्यास काही अडचण येणार नाही. CNET च्या चाचणीत कोणतीही अडचण आली नसती तर हा फोन कमीत कमी ६ ते १२ महिने व्यवस्थित वापरला जाऊ शकतो. व्यवस्थित फोल्ड होऊ शकतो. तर मोटोरोलाने या फोल्ड संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, मोटो रेजर कमीत कमी २ वर्षापर्यंत व्यवस्थित फोल्डेबल होऊ शकतो, असे म्हटले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here