नवी दिल्लीः २०१९ मध्ये १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले अनेक स्मार्टफोन अनेक कंपन्यांनी लाँच केले आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये Samsung Galaxy M20 लाँच करण्यात आले. तर दोन महिन्यापूर्वी हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. जर तुम्हाला चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. किंवा तुमचे बजेट १० हजारांपेक्षा कमी आहे. तर हे पर्याय तुमच्यासाठी खास असू शकतात.

Realme 5

रियलमी ५ लेटेस्ट कॅमेरा-फोकस्ड स्मार्टफोन आहे. हा फोन दिसायला खूपच छान आहे. फोनची साइज ही एका हाताने हाताळण्यासाठी थोडी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु, अन्य कोणत्याही समस्यांविना हा फोन वापरण्यासाठी खूपच चांगला आहे. १० हजारांपेक्षा कमी किंमत असलेला हा एकमात्र क्वॉड कॅमेरा सेटअप असलेला स्मार्टफोन आहे. प्रायमरी सेन्सर लँडस्केप फोटो चांगला काढतो. वाइड अँगल शॉट्समध्ये डिटेलची कमतरता आहे. परंतु, क्लोज अप शॉटसाठी हा फोन चांगला आहे. कमी सूर्य प्रकाशात फारसा चांगला फोटो येत नसल्याचे दिसले. एचडी व्हिडिओ लूप टेस्टमध्ये स्मार्टफोन २२ तास आणि ३१ मिनिट पर्यंत चालला. Realme 5 चे तीन पर्याय आहेत. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज, ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचे तीन पर्याय आहेत.

या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा Samsung ISOCELL GM1 सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी नोट ७ एस हा फोन सक्षम स्मार्टफोन आहे. डे-टू-डे टॉस्कला सहज हँडल करू शकतो. हातातील फोन प्रीमियम लुक देतो. परंतु, यावर बोटाची ठसे उमटतात. एचडी व्हिडिओ लूप टेस्टमध्ये १३ तास १७ मिनिटपर्यंत हा फोन चालला. फोनमध्ये दोन भागात दोन रियर कॅमेऱ्याचा कलर रिप्रोडक्शन सह चांगला कॅप्चर करतो. कमी प्रकाशात चांगला फोटो काढला जातो. Xiaomi Redmi Note 7S मध्ये दोन पर्याय आहेत. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेज आहे. यातील ३ जीबी रॅमचा फोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीतील आहे.

Redmi 7

१० हजारापेक्षा कमी किंमतीतील फोनपैकी हा फोन चांगला आहे. रेडमीचे प्रसिद्ध आणि पॉवरफुल फोन खरेदी करणाऱ्यांसाठी रेडमी ७ हा फोन एक चांगला पर्याय आहे. एचडी व्हिडिओ लूप टेस्टमध्ये रेडमी फोन १७ तासांपर्यंत चालला. फोनचा कॅमेरा जबरदस्त आहे. कमी प्रकाश असताना चांगला फोटो काढला जाऊ शकतो. हा फोन दोन पर्यायात येतो. २ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी प्लस ३२ स्टोरेज हे दोन पर्याय आहेत. परंतु, यातील ३ जीबी रॅमचा पर्याय बेस्ट आहे.

Realme U1

हा फोन किंमतीच्या तुलनेत खूपच चांगला आहे. रियलमी यू१ ची डिझाइन चांगली आहे. परंतु, या फोनच्या मागे बोटाची ठसे उमटतात. फोनमध्ये पांढरा आणि क्रिस्प डिस्प्ले आहे. यासाठी व्ह्यूंग अँगल ही चांगला आहे. या फोनमध्ये हीलियो पी७० प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या फोनची बॅटरी लाइफ चांगली आहे. एचडी लूप टेस्टमध्ये हा फोन १४ तास ५६ मिनिट सुरू होता. या फोनमध्ये ड्युअल कॅमेऱ्याचा सेटअपमध्ये लाइट असताना चांगला फोटो काढला जाऊ शकतो. परंतु, कमी प्रकाशात फोटा फारसा चांगला येत नाही. हा फोन पर्यायात उपलब्ध आहे. त्यापैकी ३ जीबी रॅम फोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीत येतो.

शाओमीचा हा फोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीत येतो. बजेटमधील फोन असणाऱ्यांसाठी हा फोन बेस्ट आहे. फोनमध्ये क्रिस्प फुल एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. फोनची बॅटरी खूपच चांगली आहे. एचडी व्हिडिओ लूप टेस्टमध्ये फोनची बॅटरी १३ तास १० मिनिटे चालली. फोटो चांगला काढला जावू शकतो. हा फोन दोन पर्यायात उपलब्ध आहे ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज हे दोन पर्याय आहेत. यातील ४ जीबी रॅम हा फोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीत येतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here