नवी दिल्लीः प्रीमियम स्मार्टफोन कंपनी अॅपलचे SE2 () चे अनेक खास वैशिष्ट्ये लिक झाली आहेत. कंपनीचा हा स्वस्तातील फोन असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार या फोनला आयफोन ९ () असेही नाव दिले जाऊ शकते. नव्या फोनमध्ये ४.७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले, टच आयडी, होम बटन आणि खूपच स्लीम बेजल्स देण्याची शक्यता आहे. यात ३.५ एमएम हेडफोन जॅक नसण्याची शक्यता आहे.

आयफोन ९ मध्ये A13 Bionic चिप दिली जाणार आहे. कंपनीच्या लेटेस्ट iPhone 11 मध्ये ही चिप पाहायला मिळाली होती. हा कंपनीच्या लेटेस्ट iOS 13 वर चालणार आहे. या फोनविषयी काही माहिती समोर आली असून या माहितीनुसार, हा फोन मार्च मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनविषयी कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. परंतु, आयफोन एसई२ या फोनची किंमत ३९९ डॉलर म्हणजेच २८ हजार रुपये असू शकते. अॅपल अनालिस्ट मिंग ची कुओ ने या आधीच शिक्कामोर्तब केले आहे की, ची डिझाइन iPhone 8 सारखी असणार आहे. तसेच यात ४.७ इंचाची स्क्रीन साइज असणार आहे. आयफोनमध्ये ग्लास बॅक कवर यूजर्सना मिळणार आहे. तसेच iPhone SE 2 ला ५.४ इंच मध्येही उतरवले जाऊ शकते. त्यामुळे या फोनची साईज iPhone 7 इतकी असू शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here