नवी दिल्लीः पोको इंडियाकडून गेल्या आठवड्यात स्वतंत्र ब्रँड म्हणून पहिला स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनचा आज पहिला सेल दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन ग्राहक अटलांटिस ब्लू, मीट्रिक्स पर्पल आणि फिनिक्स रेड या तीन रंगात खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत भारतात १५ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना काही ऑफर्सही मिळणार आहेत.

किंमत आणि फीचर्स

Poco X2 स्मार्टफोन तीन रॅमच्या पर्यायामध्ये खरेदी करता येऊ शकतो. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. पहिल्या सेलवर आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास किंवा ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.

Poco X2 ची खास वैशिष्ट्ये

स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा ऑस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. या फोनमध्ये Adreno 618 GPU दिला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर पॉवर्ड दिला आहे. स्मार्टफोनमध्ये लिक्विडकूल टेक्नोलॉजी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी २७ वॅट सपोर्ट दिला आहे. ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच पोकोमध्ये IR blaster दिला आहे. या फोनमध्ये रियरमध्ये ४ कॅमेरे दिले आहेत. प्रायमरी कॅमेरा हा ६४ मेगापिक्सलचा Sony IMX686 सेन्सर आहे. तसेच बॅकमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनच्या फ्रंटला ड्युअल इन स्क्रीन कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी फ्रंटला २० मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ६८ मिनिटात हा फोन शून्यापासून शंभर टक्के फुल चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here