नवी दिल्लीः चीनची टेक कंपनी शाओमीचा रेडमी () ब्रँडचा स्मार्टफोन आज लाँच होणार आहे. या फोनसंबंधी कंपनीने गेल्या आठवड्यात एक टीझर जाहीर केला होता. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, हा फोन कोणता असणार आहे, यासंबंधी कंपनीकडून अद्याप घोषणा करण्यात आली नाही. रेडमी ८ ए चा अपग्रेडेड व्हर्जन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नव्या फोनचा टीझर रेडमीने गेल्या आठवड्यात जारी केला आहे. या टीजरमध्ये कोणतीही माहिती नाही. परंतु, टीझर करण्यात आलेल्या पोस्टमधून अंदाज बांधला जातोय की, कंपनी Redmi 8A ला अपग्रेड मॉडेलला लाँच करण्याची तयारी करीत आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर भारतात Redmi 9A लाँच करण्याची शक्यता आहे. इंडियाचे अध्यक्ष मनु कुमार जैन यांनी शाओमीच्या ही आनंदाची बातमी दिली होती. Redmi इंडिया कडून जारी करण्यात आलेल्या ट्विट आणि शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर बनवलेला मायक्रो-साइट मध्ये कंपनीने पुढच्या फोनची घोषणा केली आहे. देश का दमदार स्मार्टफोन’ अशा टॅगलाइनसह हा टीझर जारी करण्यात आला होता. शाओमीने याआधी रेडमी ६ए, रेडमी ७ए, आणि रेडमी८ए, असे फोन लाँच केले आहेत. ‘देश का स्मार्टफोन’, ‘स्मार्ट देश का फोन’ आणि ‘स्मार्ट देश का दमदार स्मार्टफोन’ अशा टॅगलाइनसह हे फोन लाँच करण्यात आले होते. म्हणून ‘देश का दमदार स्मार्टफोन’ अशी टॅगलाइन असल्याने हा Redmi 9A असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

रेडमीचा फोन भारतात आज दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. मायक्रो साइटच्या माहितीनुसार या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे. मनु कुमार जैन यांनी शाओमीच्या चाहत्यांना ही माहिती दिली असून ११ फेब्रुवारी रोजी सरप्राइज मिळणार असल्याचे म्हटले होतो. शाओमीचे सरप्राइज ग्राहकांना कसे मिळतेय, हे आज दुपारी उघड होणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here