नवी दिल्लीः शाओमीचा सब ब्रँड रेडमीने आपला बजेटमधील स्मार्टफोन आज लाँच केला आहे. कंपनीचा हा रेडमी ८एचे आधुनिक मॉडेल आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्यासह आणला आहे. या फोनची किंमत ६ हजार ४९९ रूपये ठेवली आहे. हा आपल्या सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे. ज्यात यूएसबी टाईप सी पोर्ट, फास्ट चार्जिंग आणि गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे फोन तीन रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत. व्हेरिंयट सी ब्लू, स्काय व्हाईट, आणि मिडनाइट ग्रे हे तीन रंग ग्राहकांना उपलब्ध असणार आहेत. कंपनीने या फोनसोबत एक पॉवरबँक सुद्धा लाँच केली आहे.

Redmi 8A dual ची किंमत

हा स्मार्टफोन दोन पर्यायात उपलब्ध करण्यात आला आहे. २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅम असे हे पर्याय आहेत. २ जीबी रॅमच्या फोनची किंमत ६ हजार ४९९ रुपये इतकी आहे. तसेच ३ जीबी रॅम फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com आणि ऑनलाइन पार्टनर अॅमेझॉन इंडिया वरून होणार आहे. या फोनचा पहिला सेल १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.

Redmi 8A dual चे फीचर्स

या फोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच सह आहे. फोनमध्ये २ जीएचझेड क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅमच्या फोनमध्ये ३२ जीबीचा स्टोरेज मिळणार आहे. या फोनमध्ये व्हीओवायफाय फीचर देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळणार आहे. रियर कॅमेऱ्यात एआय सीन डिटेक्शन आणि एआय पोर्टेट मोडसह येणार आहे. फ्रंटच्या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. स्मार्टफोनची बॅटरी पॉवर फुल आहे. यात ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच १८ वॅटचा फास्ट चार्जर दिला आहे. यात रिवर्स चार्जिंगचे फीचर देण्यता आले आहे.

शाओमीचा पॉवर बँक

स्मार्टफोनशिवाय कंपनीने दोन रेडमी पॉवर बँक आज लाँच केले आहेत. 10,000mAh आणि 20,000mAh क्षमतेचे दोन पॉवर बँक आहेत. यात ड्युअल इनपूट आणि ड्युअल इनपूटचा सपोर्ट दिला आहे. १० हजार एमएएचच्या पॉवर बँकेत १० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. तर २० हजार एमएएच क्षमतेच्या पॉवर बँकेला १८ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे. छोट्या पॉवर बँकेची किंमत ७९९ रुपये तर मोठ्या पॉवर बँकेची किंमत १४९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here