नवी दिल्लीः (Vodafone) च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिल पेमेंट्स केल्यानंतर युजर्ससाठी व्होडाफोन कंपनीने आणली आहे. ही ऑफर मोबाइल रिचार्जसाठीही उपलब्ध आहे. कॅशबॅक स्कीम साठी व्होडाफोनने सोबत पार्टनरशीप केली आहे. कंपनीच्या या ऑफर्सचा लाभ सध्याचे युजर्सही घेऊ शकतात.

मर्यादीत ऑफर

यशस्वी रिचार्ज झाल्यानंतर युजर्संना १५ रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच राहिलेले २ हजार ४८५ रुपये पेटीएम मूव्ही, फ्लाइट, बस किंवा पेटीएम फर्स्ट व्हाऊचर दिला जाण्याची शक्यता आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्संना आपला नंबर कमीत कमी १४९ रुपयांच्या पॅकवरून रिचार्ज करावा लागणार आहे. ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठी असल्याचे पेटीएमने सांगितले आहे.

प्रोमो कोड टाका

ऑफर मिळवण्यासाठी युजर्संना कोणतेही पेमेंट करण्यासाठी VODANEW2500 हा प्रोमो कोड वापरणे गरजेचे आहे. सध्याच्या युजर्संना VODA2500 प्रोमो कोड अप्लाय करणे गरजेचे आहे. जर तुम्ही लकी ठरला तर तुम्हाला रिचार्ज बिल पेमेंट केल्यानंतर २४ तासांत पेटीएमचे बक्षीस मिळेल.

४९९ रुपयांचा प्लान लाँच
व्होडाफोनने नुकताच ४९९ रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे. दररोज १.५ जीबी डेटा ऑफरच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस दिले जाणार आहे. प्लान जी५ आणि व्होडाफोन प्लेच्या फ्री सब्सक्रिप्शनसोबत येतो. हा प्लान काही सर्कलमध्ये ७० दिवसांच्या वैधतेसह आणि काही ठिकाणी ६० दिवसांच्या वैधतेसह दिला जातो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here