२४ तारखेपासून सुरू होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसवर सावट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

चीनमधून येणाऱ्या सामग्रीवर बव्हंशी अवलंबून असलेल्या स्मार्टफोन उद्योगाला आता करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची झळ बसू लागली आहे. स्मार्टफोनसाठी चीनमधून मोठ्या प्रमाणावर सुटे भाग तसेच अर्धउभारणी झालेले फोन आयात केले जातात. त्यांची आयात थांबल्यामुळे या उद्योगक्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याचा थेट परिणाम म्हणून येत्या काळात स्मार्टफोन महागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. चिनी नववर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच हे संकट आल्यामुळे अनेक कारखान्यांनी नववर्षानिमित्त दिलेली सुट्टी सोमवारपर्यंत (१० फेब्रुवारी) वाढवली होती. त्यानंतर आता हळूहळू काही कारखाने सुरू होण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे येत्या काळात स्मार्टफोनसाठी लागणाऱ्या सामग्रीचा पुरवठा सुरू होईल, अशी आशा इंडिया सेल्युलर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसी) या संघटनेचे चेअरमन पंकज मोहिंद्रू यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सध्या स्मार्टफोन उद्योग बदलणाऱ्या परिस्थितीचे केवळ अवलोकन करत आहे. काळ अत्यंत कठीण आहे.

मोबाइल वर्ल्ड काँग्रेसवर सावट

चीनमध्ये करोनाची लागण झाल्याने मरण पावलेल्यांची संख्या १,०१६ झाली आहे. हुबेई प्रांतात या विषाणूने बाधित लोकांनी संख्या ४२,६३८ झाली आहे. चीनबाहेर ३० ठिकाणी करोनाग्रस्त ३५० जण आढळले आहेत. त्यातच फिलिपाइन्स आणि हाँगकाँगमध्ये प्रत्येकी एक करोनामुळे मरण पावला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २४ तारखेला स्पेनमधील बार्सिलोना येथे जागतिक माबोइल काँग्रेस भरत आहे. करोना विषाणूच्या भीतीने एरिक्सन, अॅमेझॉन, सोनी यांच्यासारख्या बड्या कंपन्यांनी या काँग्रेसला न जाणेच पसंत केले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here