नवी दिल्लीः डेज सेल २०२० () १० फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. हा सेल १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. रियलमी फोन खरेदी करायचा असल्यास ही तुमच्यासाठी खास संधी आहे. रियलमी डेज सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि वर हा सेल सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनसोबतच अन्य रियलमीचे गॅझेट्सवर चांगली ऑफर मिळत आहे.

Realme Days Sale दरम्यान, Realme.com वर दिल्या जाणाऱ्या ऑफर्समध्ये काही मॉडेलवर विना व्याजचे ईएमआय, १० टक्के मोबिक्विक सुपरकॅश आणि ५०० रुपया पर्यंत एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टसवर ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तत्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के सूट दिली जात आहे. काही फोन्सवर एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

रियलमी ५ प्रो या फोनवर ३ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. ४ जीबी रॅमचा फोन सेलमध्ये ११ हजार ९९९ रुपयांना तर ६ जीबी रॅमचा फोन १२ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. ८ जीबी रॅम फोन या सेलमध्ये १४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकेल. सूटसोबत इतर काही ऑफर्सचा फायदा ग्राहक घेऊ शकतात.

Realme C2
या सेलमध्ये रियलमी सी२ च्या २ जीबी रॅम फोन ५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. ३ जीबी रॅमचा फोन ६ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. दोन्ही फोन हे ३२ जीबी स्टोरेजमध्ये येतात. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

रियलमी एक्स२ प्रोवर २ हजारांची सूट आहे. हा फोन ६ जीबी रॅमचा आहे. या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. परंतु, हा फोन या सेलमध्ये २७ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तर ८ जीबी रॅम फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. आणि १२ जीबी रॅमच्या फोनची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे.

Realme X2
या फोनवर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टवर दिल्या जाणाऱ्या ऑफरनुसार, ४जीबी रॅमच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम फोनची १८ हजार ९९९ रुपये, ८ जीबी रॅम फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here