नवी दिल्लीः चीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसचा फटका आता स्मार्टफोन उद्योग क्षेत्राला बसू लागला आहे. शाओमीचा प्रसिद्ध च्या फोनची किंमत वाढली असून ही किंमत करोना व्हायरसमुळे वाढल्याचे सांगण्यात येत आहे. शाओमीने भारतात या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ केली आहे.

या फोनची किंमत वाढवण्यात आली असली तरी ती किंमत तात्पुरत्या स्वरूपाची असल्याची माहिती शाओमीकडून देण्यात आली आहे. चीनमधील करोना व्हायरसचा धोका संपल्यानंतर या स्मार्टफोनची किंमत आधीप्रमाणे आकारली जाईल, असे शाओमीने स्पष्ट केले आहे. ची सध्या अमेझॉनवर विक्री करण्यात येते. या फोनचा तुटवडा होत असला तरी लवकरच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे. Redmi Note 8 च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये होती. परंतु या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ झाल्याने या फोनची किंमत १० हजार ४९९ रुपये झाली आहे.

या फोनची किंमत वाढवण्यात आल्यानंतर या फोनची विक्री सध्या Mi.com आणि Amazon वर सुरू आहे. परंतु, अॅमेझॉनवर हा फोन आऊट ऑफ स्टॉक दाखवला जात आहे. त्यामुळे हा फोन १८ फेब्रुवारीपासून उपलब्ध होईल, असे सांगण्यात येईल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here