नवी दिल्लीः चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयफोन ११ प्रो () वर पहिल्यांदा डिस्काउंट दिला जात आहे. आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आयफोन चाहत्यांना मिळणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सीरिज अंतर्गत हा फोन भारतात लाँच करण्यात आला होता. हा फोन खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

iPhone 11 Pro चा ६४ जीबी स्टोरेजच्या फोनवर ६ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटनंतर फोनची किंमत ९३ हजार ९०० रुपये झाली आहे. या फोनची किंमत ९९ हजार ९०० रुपये इतकी आहे. तसेच हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या फोनमध्ये ५.८ इंचाचा सुपर रेटिना एक्सडिआर ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्युशन 1125 x 2436 आहे. तसेच या फोनमध्ये A13 Bionic chip आणि ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोन लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप मिळणार आहे. यात १२ मेगापिक्सलचा वाइड लेन्स, १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स दिला आहे. तसेच फ्रंटला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

या फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच ३,०६५ एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ग्राहकांना हा फोन सिल्वर, मिडनाईट ग्रीन आणि स्पेस ग्रे या रंगात फोन मिळेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here