या हेडफोनची बॅटरी ७ ते ८ तासापर्यंत चालते, अशा दावा कंपनीने केला आहे. या हेडफोनमध्ये एचडी ऑडिओ सुद्धा दिला आहे. तसेच यात कॉलिंग साठी एक माइक दिला आहे. केडीएमने या हेडफोनमध्ये ब्लूटूथ ४.२ दिला आहे. याचा रेंज १० मीटर आहे. या हेडफोनची किंमत १ हजार ४९९ रुपये इतकी आहे. या हेडफोनचा वापर गेमिंग, व्हिडिओ चॅटिंग किंवा म्युझीक कॉलिंग करण्यासाठी केला जाऊ शकतो. या हेडफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात मेमरी कार्ड स्लॉट मिळतो. त्यामुळे मेमरी कार्ड लावून आरामात संगीत ऐकू शकता. या हेडफोनमुळे बाहेरचा गोंगाट ऐकायला मिळणार नाही.
या हेडफोनमध्ये ५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी दोन तासात फूल चार्ज होऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. हा हेडफोन ब्लॅक, सफेद, व रेड कलरमध्ये उपलब्ध आहे. याचे वजन २५० ग्रॅम इतके आहे. या हेडफोनची वॉरंटी एक वर्ष दिली आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times