१२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ४७ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. शाओमीने या दोन फोनसोबत एक ६५ वॅटचा चार्जरही लाँच केला आहे. या चार्जरची किंमत १५०० रुपये आहे. शाओमीने हे दोन्ही फोन चीनमध्ये लाँच केले आहेत. या दोन्ही फोनला ५ जी सपोर्ट करणार आहे.
ची किंमत
शाओमीचा आणखी एक स्मार्टफोन Xiaomi Mi 10 Pro चा ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५० हजार रुपये तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. १२ जीबी रॅम प्लस ५१२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६० हजार रुपये असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
शाओमी Mi 10 चे वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. 90Hz रिफ्रेश रेटचा हा डिस्प्ले पंच होल डिझाइन सह देण्यता आला आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सल, १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, दोन मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ८के रिझॉल्यूशनचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये ४७८० एमएमएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी ३० वॅट वायर आणि वायरलेस दोन्ही चार्जिंगला सपोर्ट करते. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचे फीचर दिले आहे.
शाओमी Mi 10 Pro चे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस HDR10+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz चा रिफ्रेश रेटसोबत दिला आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १०८ मेगापिक्सल आहे. यात २० मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, एक १२ मेगापिक्सलचा आणि एक ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा दिला आहे. फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. फास्ट चार्जिंगसाठी 50W वायर आणि 30W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. यात रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचे फीचर देण्यात आले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times