Realme C3 ची किंमत आणि ऑफर
कंपनीने या फोनला दोन रॅममध्ये लाँच केले आहेत. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा तर दुसरा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचे दोन पर्याय आहेत. ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे तर ४ जीबी रॅमच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. जिओ ग्राहकांना फोन खरेदी केल्यावर ३४९ रुपयांचा प्लान बेनेफिट देत आहे. तसेच फोनवर १ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे.
Realme C3 या फोनचे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हिलियो जी७० चिपसेट दिली आहे. फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. रियलमीने यात ड्युअल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि २ मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे. युजर्संना फोनमध्ये फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमधून एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता येते. फोनमध्ये ४ जी VoLTE, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस पोर्ट, यासारखे फीचर्स दिला आहेत. फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग फीचरसहग ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times