नवी दिल्लीः () करण्यात आला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी असलेल्या या फोनची किंमत कंपनीने आता १ हजार रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना आता १३ हजार ९९९ रुपयांऐवजी १२ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकणार आहे. याआधी गेल्या महिन्यात कंपनीने ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरलन स्टोरेजच्या फोनची किंमत सुद्धा १ हजार रुपयांनी कमी केली होती.

या फोनमध्ये १५६०x७२० पिक्सल रिझॉल्यूशन सह ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. दोन स्टोरेजच्या प्रकारात येणाऱ्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर दिला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या सपोर्टसह या फोनमध्ये ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर व ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी १५ वॅट फास्ट चार्जर देण्यात आले आहे.

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए५१एस या स्मार्टफोनला अँड्रॉयड १० अपडेट रोलआउट करणे सुरू केले आहे. अपडेटमध्ये कंपनीने या फोनला अँड्रॉयड १० फीचर्ससह फेब्रुवारी २०२० चे सिक्युरिटी पॅच देत आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here