काय करावं?
मायक्रोसॉफ्टकडून च्या युजर्सनी आता विंडोज १० असलेले नवीन कम्प्युटर्स वापरावे असा सल्ला देण्यात आला आहे. हे सांगताना त्यांनी नवीन कम्प्युटर्स हे पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेचे, सुरक्षित आणि आठ वर्ष आधीच्या तुलनेत स्वस्त आहेत, असं नमूद केलं आहे.
विंडोज ७ ते विंडोज १०
सध्याचा विंडोज ७ असलेल्या कम्पुटरमध्ये विंडोज १०साठी लागणाऱ्या सर्व गोष्टी असतील तर विंडोज १० विकत घेऊन सध्याच्या कम्पुटरवर ते इन्स्टॉल करता येईल. मात्र मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार नवीन विंडोज १० कम्पुटर वापरणं अधिक फायदेशीर ठरेल.
मोफत अपग्रेड करता येईल?
विंडोज १० मोफत अपग्रेड करण्यासाठीची अंतिम तारीख २९ जुलै, २०१६ होती. त्यामुळे आता एक तर नवीन विंडोज १० कम्पुटर घ्यावा लागेल किंवा सध्याच्या कम्पुटरवर विंडोज १० इन्स्टॉल करावं लागेल.
जर विंडोज ७चं वापरायचं असेल तर…
जरी मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ साठी पाठिंबा देणं बंद केलं असलं तरीही ती ऑपरेटिंग सिस्टिम वापरता येणार आहे. पण सेक्युरिटी अपडेट्स येणं बंद झाल्यानं विंडोज ७वर व्हायरस किंवा सायबर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विंडोज ७ अॅक्टिव्हेट करता येईल?
विंडोज ७ आताही इन्स्टॉल करून अॅक्टिव्हेट करता येईल, पण मायक्रोसॉफ्टनं विंडोज ७पेक्षा विंडोज १० वापरण्याचा सल्ला दिला आहे.
इंटरनेट एक्सप्लोररच्या सपोर्टचं काय?
इंटरनेट एक्सप्लोरर हा विंडोजचाच एक भाग असल्यानं याचाही सपोर्ट १४ जानेवारी रोजी संपला आहे.
वापरात असलेल्या अॅप्लिकेशन्सचं काय?
मायक्रोसॉफ्टनं विंडोज १० इन्स्टॉल केल्यावर सध्या वापरत असलेले अॅप्लिकेशन्स नव्यानं डाऊनलोड करून वापरण्याचा सल्ला दिला आहे. विंडोज १०च्या मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये विविध थर्ड-पार्टी अॅप्लिकेशन्स डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत.
नोटीफिकेशनचं काय?
१४ जानेवारीला मायक्रोसॉफ्टनं विंडोज ७ साठीचा सपोर्ट बंद केला आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेल्या कम्पुटरवर आता मायक्रोसॉफ्टकडून सेक्युरिटी अपडेट्स येणार नाहीत हे कळवण्यासाठी हे नोटीफिकेशन दिलं गेलं आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times