नवी दिल्लीः आसुस (Asus) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास सेल सुरू केला आहे. फ्लिपकार्टवर आजपासून सेल सुरू करण्यात येणार असून या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर ४ हजारांपर्यंत सूट दिली जाणार आहे. हा सेल २१ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवरून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के तत्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे.

(४ हजारांपर्यंत सूट)

६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनची किंमत ३० हजार ९९९ रुपये इतकी आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजचा फोनसह सर्व फोनवर ४ हजारांची सूट दिली जात आहे.

(३ हजारांपर्यंत सूट)

६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनवर ३ हजारांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे.

Asus Max Pro M1 (५०० रुपयांची सूट)

आसुसचा हा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन ८ हजार ४९९ रुपयांना तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन ११ हजार ४९९ रुपयांना मिळतोय. या दोन्ही फोनवर ५०० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

Asus Max M2 (५०० रुपयांची सूट)

३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनवर या सेलमध्ये ५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here