iQoo ने नुकतेच ऑनलाइन मार्केटमधून आपला स्मार्टफोन विक्री करण्याचे ठरवले आहे. भारतात या फोनची विक्री करण्यासाठी कंपनीने फ्लिपकार्टसोबत आपल्या कराराची घोषणा केली आहे. तसेच कंपनीची अधिकृत साइट यावरूनही या फोनची विक्री करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात विवोचा सब ब्रँड आयकोने भारतात आपली सुरूवात केली होती. तसेच स्वतंत्रपणे स्मार्टफोन लाँच केला होता. भारतात या फोनची टक्कर वनप्लस, हुवेई आणि शाओमीशी होईल. IQoo इंडियाकडून पाठवण्यात आलेल्या अधिकृत निमंत्रणानुसार, हा फोन २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. तसेच कंपनीच्या सोशल मीडिया चॅनेलवरूनही लाँच करण्यात येणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीने खुलासा केला होता की, नवीन फ्लॅगशीप फोन आणि iQoo.com वेबसाइटवरून फोनची विक्री करण्यात येणार आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात जबरदस्त कॅमेरा, दमदार बॅटरी आणि पॉवरफुल गेमिंग परफॉर्मन्स आहे, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीच्या टीझर्समधील माहितीनुसार, या फोनमध्ये चार रियर कॅमेरे असणार आहेत. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. तसेच या फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम असू शकतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times