नवी दिल्लीः स्मार्टफोन युजर्सच्या डेटाची चोरी करणाऱ्या २४ अॅप्सला गुगलने प्ले स्टोरमधून हटवले आहे. सायबर सिक्युरिटी वेबसाइट VPNPro ने या अॅप्सची चोरी पकडली होती. हे अॅप्स ग्राहकांच्या डेटावर डल्ला मारत होते. त्यामुळे गुगलने या अॅप्सवर कारवाई केली असून त्यांना प्ले स्टोरमधून हटवण्यात आले आहे. या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जगभरात ३८ कोटीहून अधिक लोकांनी हे अॅप्स डाउनलोड केले होते.

संशोधनाच्या माहितीनुसार, या अॅप्सला डाउनलोड करताना ते तुमच्याकडे फोनमधील कॅमेरा, फोटो गॅलरी आणि कॉन्टॅक्ट यासारख्या फीचर्सच्या अॅक्सिसची परवानगी मागतात. परमिशन मिळाल्यानंतर हे अॅप्स फोटो क्लिक करू शकतात. व्हिडिओ-ऑडियो रिकॉर्ड करण्याबरोबरच दुसऱ्या प्रकारेही युजर्सच्या डेटाला नुकसान करीत होते. हॅकर्सने या अॅप्समधील डेटा जमा करून थर्ड पार्टीला विक्री करण्याचा धंदा चालवला होता. या अॅप्सला चीनी सरकारशी संबंधित एका कंपनीच्या Shenzen Hawk Internet Co. ने डेव्हलप केल्याचा दावा VPNPro चा आहे. या अॅप्समधील डेटा चोरी करून ती चीनला पाठवत असल्याची शक्यताही बोलून दाखवली आहे.

डेटा चोरी करणारे हेच ते २४ अॅप्स

1. Super Cleaner
2. Hi Security
3. Candy
4. Super Battery
5. Gallary
6. Net Master
7. Filemanager
8. Hi VPN Pro
9. Calculator
10. Joy Recorder
11. Weather
12. Launcher
13. Hi VPN, Free VPN
14. Soccer Pinball
15. Dig it
16. Laser Break
17. Word Crush
18. Music Roam
19. Word Croeey!
20. Puzzle box
21. Candy Gallery
22. Candy Senfie Camera
23. Private Browser
24. Calender Lite

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here