एलजी के61, एलजी के51एस आणि एलजी के41एस ची किंमत किती असणार आहे, याविषयी अद्याप कंपनीने माहिती उघड केलेली नाही. परंतु, वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हे फोन खरेदी करता येऊ शकतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. हे तिन्ही फोन सर्वात आधी अमेरिकेत उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर यूरोप व आशिया यासारख्या अन्य मोठ्या मार्केटमध्ये हे फोन उपलब्ध करण्यात येणार आहेत. LG K61 ला टायटेनियम, व्हाइट आणि ब्लू रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे. LG K51S ला पिंक आणि ब्लू या दोन रंगात तर LG K41S ला टायटेनियम, ब्लॅक आणि व्हाईट रंगात उपलब्ध करण्यात येणार आहेत.
एलजीचा के६१ या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये २.३ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने २ टीबीपर्यंत ती वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा मेन सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सुपर वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. फ्रंटला फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times