सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून परिणिती चोप्राची #MegaMonster जर्नी चांगलीच चर्चेत आहे. हा प्रवास तिने सोबत सुरू केला होता. तुम्हीही आमच्याप्रमाणे तिच्या इंस्टाग्रामवर लक्ष दिलं असेल आणि तिचं डेस्टिनेशन ओळखून Mega Monstrous Phone जिंकण्याचा प्रयत्न केला असेल, तर हा क्षण आता जवळ आला आहे. परिणितीने अखेर तिचं डेस्टिनेशन जाहीर केलं आहे. महिलांचं बेट म्हणजेच लक्षद्वीपवरील मिनिकॉय बेटावर ती गेली होती.

परिणितीने या अगोदर Samsung Galaxy M31 च्या 64MP कॅमेऱ्यातून काही फोटो काढले होते. त्यामुळे ती व्हाईट सँड बिचवर गेली असावी असा अंदाज बांधण्यात आला होता.

विविध टीझर पोस्टनंतर परिणितीने काही हिंटही दिल्या होत्या. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हालाही परिणितीचा लेटेस्ट फोटो पाहायला मिळेल, जो तिने मिनिकॉय या लक्षद्वीपमधील बेटावर काढला आहे. तुम्हालाही मिनिकॉयसाठी तिकीट बूक करायचं असेल तर थोडं थांबा आणि २५ फेब्रुवारीनंतर तिकीट बूक करा. कारण, २५ फेब्रुवारीला Samsung Galaxy M31 लाँच होणार आहे. परिणितीची ट्रिप Samsung Galaxy M31 या #MegaMonster फोनमध्ये जशी कैद झाली आहे, तशीच तुम्हालाही करता येईल. या फोनच्या क्वाड कोअर सेटअपमध्ये 64 MP मेन कॅमेरा, 5 MP डेप्थ कॅमेरा, 5 MP मॅक्रो कॅमेरा आणि 8 MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. हे सर्व फीचर परिणितीने वापरले आहेत, शिवाय स्लो-मो आणि हायपरलॅप्स मोडचाही वापर तिने करुन पाहिल्याचं फोटोंमधून दिसत आहे.

परिणितीने आणखी एक हिंट दिली आहे. तिने स्थानिक लोकनृत्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या कॅमेऱ्याने कैद केलेल्या व्हिडीओची क्वालिटी आणि ब्राईटनेस पाहून आपण काही क्षणासाठी तिचं डेस्टिनेशन ओळखायचं आहे हेही विसरुन गेलो. आम्हीही या व्हिडीओचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

आम्ही हा फोटो चांगला निरखून पाहिला आणि दक्षिणेकडील हे चित्र आहे असं लक्षात आलं. पण आम्हाला पुरेपूर खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही आणखी हिंट येण्याची वाट पाहिली, जी लवकरच मिळाली.

या फोनप्रमाणे परफेक्ट फोटो सध्याच्या घडीला मार्केटमध्ये दुसरा फोन काढतच नसेल हे मान्य करावंच लागेल. परिणितीने तिच्या प्रवासात लाइटहाऊस, पोस्टल स्टॅम्प यांचे फोटो अत्यंत स्पष्टपणे काढले, शिवाय आणखी सुंदर दिसण्यासाठी Bokeh Effect चाही वापर केला.

अखेर परिणिती कुठे गेली होती याचा शोध आता लागलेला आहे. परिणितीने या फोनसोबत जाण्यासाठी मिनिकॉय बेट निवडलं होतं.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटलं असेल की इतर बाबींसोबतच सोशल मीडियावर सक्रिय राहून परिणितीने तिच्या चाहत्यांना कसं जोडून ठेवलं असेल? मोबाइलची बॅटरी संपली नसेल का? तर याचं उत्तर आहे Samsung Galaxy M31 मध्ये असलेली 6000 mAh क्षमतेची बॅटरी. तुमची इच्छा असली तरीही ही बॅटरी लवकर संपणार नाही. या बॅटरीला इंटरनेटसाठी २१ तास, ४८ तास टॉक टाइम, २६ तास व्हिडीओ प्ले टाइम आणि ११९ तास म्युझिक प्ले टाइम आहे. विशेष म्हणजे ही बॅटरी फास्ट चार्ज होते आणि तुमचा वेळही वाचवते.

कॅमेरा आणि बॅटरी एवढंच पुरेसं नाही. यामध्ये FHD+ sAMOLED Infinity U डिस्प्ले देण्यात आला आहे. समजा तुम्ही एखादा व्हिडीओ पाहत आहात आणि तो एका एजपासून दुसऱ्या एजपर्यंत स्ट्रेच होत आहे, तर कसं वाटेल?

सर्वांनाच वाटतं आपले फोटो सुंदर यावेत. तुम्हालाही परिणितीप्रमाणेच ट्रिप प्लॅन करायची असेल तर फोन लाँच होईपर्यंत वाट पाहावी लागेल. Samsung Galaxy M31
२५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १ वाजता आणि स्टोअरसह काही इतर रिटेल स्टोअरमध्येही लाँच होणार आहे. विशेष म्हणजे या अत्यंत कमी किंमतीचा फोन असेल असंही बोललं जात आहे. तुम्ही पाच लकी विजेत्यांपैकी ठरलात तर तुम्हालाही परिणितीप्रमाणेच मिनिकॉयची ट्रिप प्लॅन करण्याची इच्छा होईल.

डिस्क्लेमर : ही ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने लिहिली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here