नवी दिल्लीः शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्मवरील TikTok वर आता पालकांचा कंट्रोल राहणार असणारं नवं फीचर आलं आहे. मुलगा किंवा मुलगी कोणता टिकटॉक करणार आहे. याची माहिती त्यांच्या पालकांना आधीच समजणार आहे. फॅमिली सेफ्टी फीचर असं या फीचरचं नाव आहे. हे फीचर पालकांच्या अकाउंट्सला लिंक करते. त्यामुळे पालकांना या टिकटॉकची माहिती आधीच समजते.

ज्यावेळी लोक टिकटॉकचा वापर करतात. त्यांचा अनुभव गंमतशीर, स्पष्ट आणि सुरक्षित असतो. आम्ही युजर्संना या प्लॅटफॉर्मवर चांगला व सुरक्षित अनुभव देण्यासाठी आहोत. त्यासाठी हे नवं फीचर आणणार आहोत. म्हणूनच फॅमिली सेफ्टी मोड अनाउंसची घोषणा करण्यात आली आहे. या फीचरच्या मदतीने पालक अल्पवयीन मुला-मुलीच्या टिकटॉकरव कंट्रोल करू शकणार आहे. त्यांच्यावर नजर ठेवू शकणार आहे. भारतात अल्पावधीत टिकटॉक खूप प्रसिद्ध झाले आहे. टिकटॉकचे लाखो युजर्स आहेत. यात अल्पवयीन मुला-मुलींचीही मोठी संख्या आहे. या मुला-मुलींचे टिकटॉक सुरक्षित राहावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय युजर्सने टिकटॉकवर २०१८ सालच्या तुलनेत ६ पट अधिक वेळ घालवला आहे. २०१९ मध्ये भारतीयांनी ५.५ अब्ज तास टिकटॉकवर घालवला आहे. मोबाइल आणि अॅनालिटिक्स फर्म App Annie च्या माहितीनुसार, अँड्रॉयड युजर्सने २०१८ मध्ये एकूण ९०० मिलियन (९ कोटी) तास टिकटॉकवर घालवले आहेत. ही वाढ अचंबित करणारी ही. या अॅपने फेसबुकलाही मागे टाकले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here