नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपवर इमोजी आणि टेक्स्टच्या मदतीने अनेकदा आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. तसेच जीआयएफ पिक्चरच्या मदतीने आपले विचार व्यक्त करता येऊ शकता येतात. व्हॉट्सअॅपवर खूप सारे जीआयएफ पिक्चर असून त्याच्या मदतीने भावनांना वाट मोकळी करून देता येते. जर तुम्हाला तुमच्या पसंतीचे GIF मिळाले नाही. तर तुम्ही स्वतःचे बनवा व मित्रांना शेअर करू शकता. तुमच्याकडे असलेल्या व्हिडिओतील कोणत्याही भागाचा GIF बनवता येवू शकतो. सहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा व्हिडिओचा एक GIF बनवता येऊ शकतो. यासाठी काही सोप्या स्टेप्सचा वापर करावा लागेल.

>> सर्वात आधी स्मार्टफोनमधील ओपन करा

>> कोणत्याही व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपची चॅट ओपन करा. ज्यांना GIF पाठवायची आहे.

>> चॅट बॉक्समध्ये दिसत असलेले अॅटचमेंट आयकॉनवर क्लिक करा

>> त्यानंतर फोनच्या गॅलरीमधून तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ निवडा. जो तुम्हाला GIF बनवायचा आहे.

>> व्हॉट्सअॅप व्हिडिओचा प्रीव्ह्यू पाहू शकता.

>> या व्हिडिओला ट्रिम करू शकता. किंवा शॉर्ट क्लिपची निवड करू शकता.

>> आता GIF बॉक्सवर टॅप करा. नंतर व्हिडिओ GIF मध्ये कन्वर्ट होईल.

>> व्हिडिओची लांबी कमी-जास्त करू शकता.

>> पाठवण्याआधी GIF मध्ये टेक्स्ट, कॅप्शन किंवा इमोजी अॅड करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here