नवी दिल्लीः भारतात रेल्वे स्टेशनवर मिळणारी गुगलकडून बंद करण्यात येत असली तरी ही सेवा सुरूच ठेवण्याचा निर्धार रेलटेलने केला आहे. मे २०२० मध्ये रेल्वे स्टेशनवरील वायफाय सेवा गुगलकडून बंद करण्यात येणार आहे. गुगलने २०१६ साली जगातील अनेक देशात ५ हजारांहून अधिक ठिकाणी आपली सेवा सुरू केली होती. परंतु, भारतातील सेवा मे महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनवर मिळणारी फ्री वायफाय सेवा बंद करण्यामागे गुगलने आपला व्यवसाय हे कारण दिले आहे. व्यवसायात अडचण निर्माण होत असल्याने ही सेवा बंद करण्यात येणार असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले आहे. सहकारी कंपनीसोबत अडचण निर्माण झाल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे. २०१६ साली सेवा सुरू केल्यापासून बाजारात खूप मोठा बदल झाला आहे. विशेष म्हणजे, ४ जी चा वेगवान प्रसाराने मोबाइल डेटाच्या किंमतीत खूप मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे याचा फरक सेवेवर पडणे साहजिक आहे. फ्री वायफाय प्रोग्रॅमच्या तुलनेत आता जास्त मागणी राहिली नाही. कंपनीने जाहिराती देऊन आपली स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न केला होता. फ्री सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना रेलटेलने दिलासा दिला आहे. भारतातील ४०० रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय सेवा सुरूच राहणार असल्याचे रेलटेलने म्हटले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here