नवी दिल्लीः () युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आता आपल्या १,९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानमध्ये ७१ दिवसांची अतिरिक्त वैधता देण्यास सुरुवात केली आहे. बीएसएनएलचा हा प्लान रिलायन्स जिओच्या नुकताच लाँच झालेल्या २,१२१ रुपयांच्या प्लानला जोरदार टक्कर देणार आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत बीएसएनएलच्या या प्लानमध्ये ४३६ दिवस तर १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान या प्लानमध्ये ४२५ दिवसांची वैधता ऑफर दिली जात आहे.

कंपनीची एक्स्ट्रा वैधता ही प्रमोशनल ऑफर अंतर्गत दिली जात आहे. आधी प्रमोशनल ऑफरमध्ये युजर्संना ७१ दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जाणार आहे. यासाठी युजर्संना आपला नंबर २८ फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी रिचार्ज करावा लागणार आहे. तर दुसऱ्या प्रमोशनल ऑफर मध्ये १ मार्च ते ३१ मार्च पर्यंत रिचार्ज केल्यानंतर ६० दिवसांची अतिरिक्त वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना दररोज ३ जीबी डेटा, १०० फ्री एसएमएस आणि कॉलिंग करण्यासाठी दरदिवशी २५० मिनिट्स दिली जात आहे. या प्लानमध्ये अन्य फायदा म्हणजे, यात बीएसएनएल टीव्ही आणि बीएसएनएल ट्यून्सचा फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या प्लानमध्ये मिळणारे सर्व फायदे हे केवळ ३६५ दिवसांसाठी आहेत.

रिलायन्स जिओला टक्कर

BSNLचा हा प्लान रिलायन्स जिओला जोरदार टक्कर देणार असल्याचे दिसत आहे. रिलायन्स जिओने नुकताच आपल्या वार्षिक प्लानची वैधता ही २९ दिवसांनी कमी केली आहे. तर बीएसएनएलने आपली वार्षिक वैधता ७१ दिवसांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओने २,०२० रुपयांचा वार्षिक प्लान बंद करून २१२१ रुपयांचा नवा प्लान सुरू केला आहे. यात १.५ जीबी डेटा दररोज मिळणार आहे. ३३६ दिवसापर्यंत दररोज १०० फ्री एसएमएस, जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिडेट कॉलिंग, अन्य नेटवर्क्ससाठी या प्लानमध्ये १२ हजार मिनिट्स दिले जात आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here