नवी दिल्लीः युजर्सला वार्षिक प्लानमध्ये आता कमी वैधता मिळणार आहे. कंपनीने १२९९ रुपयांच्या वार्षिक प्लानमध्ये (३६५) दिवसांची वैधता कमी करून ती आता ३३६ केली आहे. म्हणजेच आधीच्या तुलनेत ही वैधता २९ दिवसाने कमी केली आहे. याआधी जिओने आपली न्यू इयर २०२० ऑफर बंद केली होती. त्यानंतर २१२१ रुपयांचा नवीन प्लान लाँच केला होता.

जिओने New Year 2020 offer बंद केली आहे. आता नवीन प्लान लाँच केली असून याची किंमत २ हजार १२१ रुपये आहे. जिओच्या या प्लानमध्ये सर्व सुविधा मिळणार जी आधीच्या न्यू इयर २०२० मध्ये मिळत होती. परंतु, नव्या प्लानची वैधता कमी करण्यात आली आहे. जिओने आता १२९९ रुपयांच्या लाँग टर्म प्लानची वैधता २९ दिवसाने कमी केली आहे. तसेच २१२१ रुपयांचा प्लानची वैधताही कमी केली आहे. त्यामुळे या दोन्ही प्लानमध्ये वैधता २९ दिवस कमी मिळणार आहे. या दोन्ही प्लानमध्ये ३६५ ऐवजी ३३६ दिवसांची वैधता मिळणार आहे. जिओच्या २,१२१ रुपयांच्या प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता असून युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी प्रतिदिन डेटा, मोफत एसएमएस आणि अॅप्सचे अॅक्सेस मिळणार आहे. दरम्यान, अनलिमिटेड कॉलिंग केवळ जिओच्या नेटवर्कवर उपलब्ध आहे. अन्य दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी या प्लानमध्ये एकूण १२,००० मिनिट्स मिळणार आहे. या प्लानमध्ये एकूण ५०४ जीबी डेटा मिळणार आहे.

दैनंदिन डेटा संपल्यानंतर युजर्सला 64Kbps ची स्पीड मिळणार आहे. या स्पीडवर फेसबुक मॅसेंजर आणि व्हॉट्सअॅपचा वापर करता येऊ शकतो. फ्री अॅक्सेसमध्ये जिओ टीव्हीसोबत जिओ चित्रपट मिळणार आहे. जिओ टीव्हीवर ६५० हून अधिक चॅनेल पाहू शकता. जिओच्या या नव्या प्लानचा सामना एअरटेलच्या २, ३९८ रुपये आणि व्होडाफोनचा २,३९९ रुपयांच्या प्लानसोबत होणार आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. तसेच दररोज १.५ जीबी डेटा मिळतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here