नवी दिल्लीः भारताचा पहिला Realme X50 Pro 5G अखेर सोमवारी भारतात लाँच करण्यात आला आहे. या आधी हा फोन बार्सिलोनामध्ये वर्ल्ड काँग्रेस (MWC) मध्ये लाँच करण्यात येणार होता. परंतु, करोना व्हायरसच्या भीतीने करण्यात आला नव्हता. या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे.

Realme X50 Pro फोन भारतातील पहिला 5G स्मार्टफोन असला तरी भारतात ५ जी कनेक्टिविटी सुरू होण्यास अजून बराच वेळ लागणार आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९९ आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्मार्टफोन मॉस ग्रीन आणि रस्ट रेड कलर या दोन रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या फ्लॅगशीप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८६५ सह देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. फोनमध्ये ६५ वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. या फोनची किंमत भारतात ५० हजार रुपये असण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंतचा सर्वात महागडा फोन ठरण्याची शक्यता आहे.

या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आली आहे. स्क्रीनच्या टॉपला ड्युअल पंचहोल कटआउट देण्यात आला आहे. स्मार्टफोनला स्क्रीन कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्टेड दिला आहे. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच बॅकमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल शूटर, १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला दोन सेल्फी कॅमेरे दिला आहे. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा Sony IMX 616 सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६५ वॅटची सुपर डार्ट चार्जिंग सह ४२०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here