२२ फेब्रुवारी २०२० रोजी हे ट्विट करण्यात आले आहे.
पोस्टचे
या ठिकाणी पाहा
अन्य ट्विट युजर्संनी हेच ग्राफिक कार्ड या दाव्यासह २४ फेब्रुवारी २०२० रोजी मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे.
या पोस्टचे
या ठिकाणी पाहा
खरं काय आहे?
रतन टाटा यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. २०१६ साली सुद्धा असाच मेसेज व्हायरल झाला होता. त्यावेळी टाटा ग्रुपने यासंबंधी स्पष्टीकरण दिले होते.
कशी केली पडताळणी?
गुगलवर ‘ JNU recruiment’ हे कीवर्ड्स टाकले. त्यावेळी आम्हाला पीटीआयचे वृत्त मिळाले. त्याचे शीर्षक
असे होते. इकॉनॉमी टाइम्सने हे वृत्त १५ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रसिद्ध केले होते.
फेब्रुवारी २०१६ रोजी पहिल्यांदा चुकीच्या दाव्यासह ही पोस्ट व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा या फेक दाव्यासह ही पोस्ट व्हायरल होत आहे.
निष्कर्ष
जेएनयूमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांना टाटा ग्रुपमध्ये नोकरी देण्यात येणार नाही, असे रतन टाटा किंवा टाटा ग्रुपने कधीही म्हटले नाही, सोशलवर व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणी स्पष्ट झाले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times