डिव्हाइसच्या लोकेशन सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन सर्व्हिसेसला डाव्या बाजूनं ऑन करा आणि मोडमध्ये ‘हाय अॅक्युरसी’ सेट करा. याशिवाय गुगल अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन आणि गुगल लोकेशन हिस्ट्रीवर टॅप करावे. त्यानंतर यूज लोकेशन हिस्ट्रीसमोरील टॉगलला ऑन करा. डिव्हाइसच्या नावासमोरील टॉगलही ऑन करावे.
गुगल मॅप्सची मदत घ्या
सर्वच फोनमध्ये अॅप इन्स्टॉल असते. त्याच्या मदतीनं हरवलेला फोन ट्रॅक करता येऊ शकतो. फोन ऑन असला तर वायफाय किंवा मोबाइल डेटा कनेक्ट असला पाहिजे. तसंच लोकेशन सर्व्हिसेसही ऑन असलं पाहिजे. त्यानंतर गुगल मॅप्स ओपन करून तुमच्या गुगल अकाउंटला लॉग-इन करावं लागेल. वरच्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या मेन्यूवर क्लिक करून ते ओपन करावे लागेल आणि ‘यूअर टाइमलाइन ऑप्शन’वर क्लिक करा. डिव्हाइस लोकेशन हिस्ट्री कधीपर्यंतची हवी आहे याचाही पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे तुमचा फोन कुठे-कुठे होता आणि आता कुठे आहे? याची माहिती मिळेल.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times