नवी दिल्लीः प्रीपेड युजर्संना गरजेनुसार रिचार्ज पॅकची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. अनलिमिटेड प्रीपेड प्लानमध्ये दैनंदिन डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन कंपनी युजर्संना अनलिमिटेड १.५ जीबी डेटा किंवा त्यापेक्षा जास्त डेटा दिला जातो. जर दैनंदिन डेटा १.५ जीबीपेक्षा कमी आणि अधिक कॉल करण्याची गरज असेल तर अशा युजर्संसाठी स्वस्तातील अनलिमिटेड प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत.

एअरटेल युजर्ससाठी २१९ रुपयांचा प्लान

एअरटेल युजर्ससाठी २१९ रुपयांचा बेस्ट प्लान आहे. यात दररोज १ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळते. तसेच फ्री हेलोट्युन्स, विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सट्रीम अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन या प्लानमध्ये मिळते. या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे.

व्होडाफोनकडे दोन प्लान

व्होडाफोनकडे दोन प्लान आहेत. १९९ रुपयांचा आणि दुसरा २१९ रुपयांचा प्लान आहे. दोन्ही प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळते. तेसच दोन्ही प्लानवर व्होडाफोन प्ले, जी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. दोन्ही प्लानमध्ये फरक इतकाच की १९९ रुपयांच्या प्लानची वैधता २४ दिवस आणि २१९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे.

रिलायन्स जिओचा प्लान

दररोज १ जीबी डेटा खर्च करण्यासाठी युजर्संना १४९ रुपये खर्च करावे लागतील. २४ दिवस वैधता असलेल्या या प्लानमध्ये १ जीबी डेटा, जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, जिओवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३०० मिनिट आणि दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत. तसेच कंपनी जिओ अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये युजर्संना मिळणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here