डीसीपी अमित शर्मा यांच्या फोटोसह कॅप्शन मध्ये म्हटलेय की, वाईट बातमी, हवालदारा रतनजी यांच्यानंतर आता डीसीपी अमित शर्मा यांचं निधन. त्यांना विनम्र अभिवादन.
अन्य अनेक फेसबुक आणि ट्विटर युजर्सनेही हाच दावा केला आहे.
खरं काय आहे?
शाहदराचे डीसीपी अमित शर्मा हे जिवंत आहेत. तसेच ते सध्या सुखरूप आहेत. दिल्लीच्या गोकुळपुरीत झालेल्या हिंसाचारात डीसीपी अमित शर्मा गंभीर जखमी झाले होते. परंतु, त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे.
कशी केली पडताळणी?
मंगळवारी TOI ने न्यूज एजन्सी ANI च्या माहितीच्या आधारावर हे
प्रकाशित केले होते की, अमित शर्मा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते आता सुरक्षित आहेत.
न्यूज एजन्सी ANI ने मंगळवारी सकाळी ट्विट करून ही माहिती दिली होती. हिंसाचारात जखमी झालेले शाहदराचे डीसीपी अमित शर्मा ऑपरेशन केल्यानंतर शुद्धीवर आले. त्यांची प्रकृती आता चांगली आहे.
ही माहिती अधिक जाणून घेण्यासाठी टाइम्स फॅक्ट चेकने TOI चे रिपोर्टर सोमरीत भट्टाचार्य यांच्याशी संपर्क साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीसीपी शर्मा आता चांगली आहेत. परंतु, पुढील ४८ तास त्यांना आयसीयूत ठेवण्यात येणार आहे.
निष्कर्ष
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला डीसीपी अमित शर्मा यांच्या मृत्यूचा दावा सपशेल खोटा आहे. अमित शर्मा यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे, असे मटा फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झाले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times