नवी दिल्लीः () ने मल्टी टीव्ही युजर्संना जोरदार झटका दिला आहे. एनसीएफ म्हणजेच नेटवर्क कॅपॅसिटी फी चार्जमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे मल्टी युजर्संना १०० चॅनेलसाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी युजर्सना १०० चॅनेलसाठी केवळ ८० रुपये मोजावे लागत होते. परंतु. आता या दरवाढीनंतर युजर्संना २० रूपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. डीटीएच कंपनी आपल्या ग्राहकांकडून एनसीएफ चार्ज वसूल करू शकते, असे ट्रायने नॅशनल टॅरिफ ऑर्डर १.० टक्क्यांतर्गंत म्हटले होते. ट्रायच्या या वक्तव्यानंतर एअरटेलने ही दरवाढ केली आहे.

एअरटेलने एनसीएफ चार्जमध्ये दरवाढ केली आहे. आता ग्राहकांना १०० एसडी चॅनेल पाहण्यासाठी १०० रुपये मोजावे लागतील. याआधी युजर्स ८० रुपये मोजत होता. परंतु, जर युजर्संना चॅनेलसोबत २५ एसडी चॅनेल घ्यायची असतील तर युजर्संना प्रति चॅनेल २० रुपये या प्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत. जर एअरटेलने एनसीएफ चार्जवर टॅक्स लावला तर ग्राहकांना १०० चॅनेलसाठी ११८ रुपये मोजावे लागतील. तर दुसरीकडे युजर्संना प्रायमरी कनेक्शन १५३ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ट्राय नॅशनल टॅरिफ ऑर्डर २.० ला १ मार्चला लाँच करणार आहे. यावेळी मल्टी टीव्ही चार्जमध्ये बदल केला जाऊ शकतो. ज्यात डीटीएच किंवा केबल टीव्ही कंपनी मल्टी टीव्ही कनेक्शन युजर्संवर एनसीएफ चार्ज अंतर्गत ४० टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. त्यामुळे या दरवाढीनंतर युजर्सना आणखी दरवाढ सहन करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here