डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला आहे की, ऑस्ट्रेलियात ब्राह्मण गाईचे मांस म्हणजेच बीफची विक्री करीत आहेत. तसेच त्या कंपनीचे असे नाव आहे.

राजरत्न यांनी दावा केला आहे की, भारतीय ब्राह्मण गायीची पुजा करतात. परंतु, ऑस्ट्रेलियात उलट परिस्थिती दिसत आहे.

या व्हिडिओसोबत राजरत्न यांनी कॅप्शन देताना लिहिलेय, गाय भारतात माता आहे. ऑस्ट्रेलियात पाहा कोण खातेय?, व्हिडिओत राजरत्न यांच्यासोबत एक व्यक्ती आहे. तसेच कंपनीचे नाव ‘Brahman Pies’ असून या कंपनीच्या बाहेर हे दोघे जण फेसबुक लाइव्ह करताना दिसत आहेत.

हा ब्रँड अनेक प्रकारे मांसाहारी उत्पादनांची विक्री करीत आहेत. याचे मालक ब्राह्मण आहेत, असा दावा या दोघांनी केला आहे. हा व्हिडिओ केवळ फेसबुकवर व्हायरल झाला नाही तर तो व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. टाइम्सच्या एका वाचकाने हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून याची सत्यता जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे?

‘Brahman Pies’ ही ऑस्ट्रेलियाची कंपनी आहे. याचा भारताशी किंवा येथील ब्राह्मणांशी काहीही संबंध नाही.

कशी केली पडताळणी?

आम्ही ‘Brahman Pies’ यांच्या फेसबुकवर जाऊन पाहिले. या ठिकाणी आम्हाला २२ फेब्रुवारी २०२० रोजीचे पोस्ट मिळाले. या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेय, १०० टक्के ऑस्ट्रेलियाची कंपनी आहे. आणि या कंपनीचा भारताच्या कोणत्याही जातीशी काहीही संबंध नाही.

तसेच याशिवाय Brahman ऑस्ट्रेलियामधील असलेल्या गायीच्या जाती वेगळ्या आहेत.

राजरत्न यांच्या व्हिडिओ संदर्भातील पोस्टमध्ये म्हटले की, व्हिडिओ पब्लिश करणाऱ्या व्यक्तीने किंवा त्यांच्या सहकाऱ्याने आमच्या कंपनीकडे किंवा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत कोणीही संपर्क साधला नाही.

निष्कर्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी बीफची विक्री केली जाणारी ऑस्ट्रेलियाची कंपनी ‘Brahman Pies’ संदर्भात चुकीची माहिती सांगितली. तसेच या कंपनीला ब्राह्मण समाजाशी जोडले असल्याचे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here