नवी दिल्लीः भारतीय युजर्संना आधीच्या तुलनेत जास्त डेटा लागत आहे. स्वस्त आणि युजर्सला वेगाने ऑनलाइन कॉन्टेंटकडे आकर्षित करण्याचे काम करीत आहे. स्वस्त प्रीपेड प्लान आणि स्मार्टफोनमुळे आज भारतात सर्वात जास्त इंटरनेटचा वापर केला जात आहे. भारतातील लोक एका महिन्यात व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच अॅप्सवर तब्बल ११ जीबी डेटा खर्च करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतातील लोक आपला सर्वात जास्त वेळ व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर घालवत असल्याचेही समोर आले आहे. इंटरनेट युसेज आणि डेटाची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलेय की २०१९ मध्ये सर्वसाधारणपणे डेटा ट्रॅफिक आणि ४ जी नेटवर्क मुळे जवळपास ४७ टक्के वाढ झाली आहे. ३ जी डेटा ट्रॅफिक मध्ये जवळपास ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. ४ जी मध्ये महिन्याला डेटा युसेज डिसेंबर मध्ये ११ जीबी हून अधिक राहिला आहे. प्रीपेड प्लान कमी किंमतीत मिळत असल्याने इंटरनेट वापराचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेट वापराच्या प्रमाणात भारत चीन, अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, स्पेन आणि जर्मनीच्या खूप पुढे आहे. भारतीय युजर्स १ जीबी डेटामध्ये एकावेळेला २०० गाणे ऐकण्याबरोबरच एक तासांपर्यंत एचडी क्वॉलिटमध्ये व्हिडिओ पाहू शकतात. भारतात डेटाची जगाच्या तुलनेत किंमत खूप कमी आहे. भारतात १ जीबी डेटाची किंमत ७ रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here