नवीन सुपर स्प्लेंडर मध्ये 125cc PFI (प्रोग्राम्ड फ्यूल इंजेक्शन) इंजिन देण्यात आला आहे. यात XSens टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. नवीन सुपर स्प्लेंडरचे पॉवर आउटपूट आउटगोइंग मॉडेलपेक्षा १९ टक्के जास्त आहे. हे इंजिन १०.७३ बीएचपी पॉवर आणि १०.६ एनएम टॉर्क जनरेट करते. हिरोच्या या बाइकमध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. बाइक हिरो आय३एस टेक्नॉलॉजी सह देण्यात आली आहे. गरज पडल्यास हे इंजिन स्वतः बंद होते तसेच इंजिन स्टार्ट होते. नवीन हिरो सुपर स्प्लेंडरमध्ये ग्राउंड क्लिअरन्स ३० एमएम वाढवून दिले आहे. या बाइकमध्ये आधीच्या तुलनेत ४५ एमएम लांब सीट देण्यात आली आहे. बाइकमध्ये २४० फ्रंट डिस्क ब्रेक दिले आहेत. तसेच बाइक १३० एमएम रियर ड्रम ब्रेक दिले आहे.
बाइकला आधीच्या तुलनेत जबरदस्त लुक देण्यात आला आहे. बाइकला ऑल न्यू मेटेलिक नेक्सस ब्लू शेडमध्ये लाँच केले आहेत. तसेच ही बाइक आणखी ३ रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. कँडी ब्लेजिंग रेड, ग्लेज ब्लॅक आणि हेवी ग्रे या तीन रंगात ही बाइक मिळणार आहे. कंपनीने आपली बीएस४ मॉडेल्सचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times