Amazon च्या Great Indian Festival Sale ला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्ही अनेक शानदार इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये तुम्हाला टॉप साउंडबारवर देखील मोठी सूट मिळेल. आम्ही तुम्हाला अशाच काही टॉप साउंडबारबाबत माहिती देत आहोत, ज्यांना तुम्ही डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या साउंडबारला तुम्ही तुमच्या स्मार्ट टीव्हीला देखील कनेक्ट करू शकता. स्मार्ट टीव्ही या एकापेक्षा एक दमदार फीचर्ससह येत असतात, मात्र यात इन-बिल्ट शानदार स्पीकर फीचर्स येत नाही. साउंड क्वालिटी चांगली नसल्याने यूजर्सला टीव्हीला साउंडबार कनेक्ट करावे लागतात. साउंडबारमुळे टीव्ही पाहण्याचा, गाणी ऐकण्याचा अनुभव अधिक शानदार होतो. याद्वारे तुम्ही घरातच थिएटरचा आनंद घेऊ शकता. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये उपलब्ध अशाच काही साउंडबारच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.

मी साउंडबार

mi-soundbar

Mi Soundbar ची किंमत ५,९९९ रुपये आहे. १०० रुपये डिस्काउंटनंतर ५,८९९ रुपयात खरेदी करू शकता. डिव्हाइसला २७८ रुपये ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. यामध्ये ८ स्पीकर ड्राइव्हर्ससह ८ बिल्ट-इन स्पीकर दिले आहेत, जे ५० Hz ते २५००० Hz फ्रीक्वेंसी रिस्पाँस रेंज प्रदान करतात. यामुळे साउंड पूर्ण स्पेक्ट्रम कव्हर करतो. घरात थिएटरचा अनुभव देण्यासाठी यात पॅसिव्ह रेडिएटर दिले आहे. साउंडबार फॅब्रिक मेश ओवरलेसह स्टाइलिश डिझिनसोबत येतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ४.२ व्हर्जन दिले आहे. अन्य डिव्हाइसला कनेक्ट करण्यासाठी ऑप्टिकल इन आणि ऑक्स इनपूट दिले आहे. याचे वजन १.९२ किलो आहे.

Infinity JBL Sonic B200WL 2.1 चॅनेल ब्लूटूथ साउंड बार

infinity-jbl-sonic-b200wl-2-1-channel-bluetooth-sound-bar

साउंडबारची किंमत १७,९९९ रुपये आहे. डिव्हाइसला ११,००२ रुपये डिस्काउंटनंतर फक्त ६,९९७ रुपयात खरेदी करू शकता. साउंडबारला २७८ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. यात एक इमर्सिव्ह डीप बेस साउंडसह १६० वॉट पॉवर सिस्टिम दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, यूएसबी, ऑक्स आणि ऑप्टिकल इनपूटचा पर्याय मिळतो. यासोबतच एक वायरलेस सबवूफर मिळते. याद्वारे डीप बास मूव्ही, म्यूझिक आणि व्हिडिओ गेम दरम्यान शानदार साउंड मिळते. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मल्टी फंक्शन सारखे फीचर्स देखील मिळतात. चित्रपट, गाणी आणि बातम्यांसाठी ३ वेगळे इक्वालाइजर मोड देखील आहेत.

BoAt AAVANTE बार 1700D 120W 2.1 चॅनेल ब्लूटूथ साउंडबार

बोट-आवंते-बार -1700 डी -120 डब्ल्यू-2-1-चॅनेल-ब्लूटूथ-साउंडबार

boat च्या साउंडबारची किंमत १९,९९० रुपये आहे. १२,४९१ रुपयांनंतर साउंडबार फक्त ७,४९९ रुपयात मिळेल. डिव्हाइसला फक्त ३५३ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. यात डॉल्बी डिजिटल प्लस टेक्नोलॉजीसह २.१ चॅनेल कॅप्टिव्हेटिंग साउंडर जनरेट येतो, चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक शानदार बनवतो. यात एक वेगळा वायर्ड सबवूफर देखील आहे. साउंडबार ६० वॉट ऑडिओ जनरेट करतो आणि सबवूफर ६० वॉट साउंड आउटपूट जनरेट करतो. २.१ चॅनेल साउंड सिस्टम मूव्ही, म्यूझिक आणि व्हिडिओ गेमासाठी डीप बेस प्रदान करतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.०, ऑक्स, यूएसबी, HDMI (ARC) आणि ऑप्टिकल दिले आहे.

itel XE SB515, 80W पूर्णपणे लोड केलेले साउंडबार

itel-xe-sb515-80w-पूर्णपणे-लोड-साउंडबार

१२,९९९ रुपये किंमतीच्या या साउंडबारला ७ हजार रुपये डिस्काउंटनंतर फक्त ५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. डिव्हाइसला २८२ रुपये ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. यात बिल्ट-इन सबवूफर आणि एक साउंड डक्ट दिले आहे. जे क्लिअर आणि हेवी बास प्रदान करते. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहे. तसे, एक इंटिग्रेटेड USB २.० पोर्ट दिला असून, याद्वारे पेन ड्राइव्ह कनेक्ट करून म्यूझिक प्ले करू शकता. यामध्ये सराउंड साउंड एक्सपेंशन फीचर दिले आहे. साउंडबारचे वजन ४.५ किलो असून, सहज भिंतीवर ठेवू शकता व टीव्ही कॅबिनेटवरही ठेवता येईल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here