जगातील पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हाट्सअॅप आणि इंस्टाग्राम तसेच मेसेंजर सर्विस भारतासह जगभरात ६ ते ७ तास ठप्प राहिली. या काळात युजर्संना प्रचंड त्रास सहन करावा लागला. परंतु, आता या तिन्ही सेवा पूर्वपदावर आल्या आहेत. या तिन्ही सेवा फेसबुकच्या अंडरमध्ये येतात. सध्या कंपनीकडून यासंबंधी काही स्पष्ट सांगण्यात आले नसले तरी काही सायबर एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, बीजीपी आणि डीएनएस (BGP आणि DNS) यामागे असू शकते. जगभरात सोशल मीडियातील अव्वल साइट असलेल्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअॅप आणि मेसेंजर या सर्विस बंद पडल्याने याचा जबरदस्त फटका कोट्यवधी युजर्संना बसला आहे. जसा युजर्संना फटका बसला तसाच फटका कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना सुद्धा बसला आहे. त्यांना कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले असून जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीतून एका पायरीची घसरण झाली आहे. जाणून घ्या यामागचे डिटेल्स.

BGP म्हणजेच बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल

bgp-

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, फेसबुकच्या सर्व सर्विस BGP आणि DNS मुळे डाउन राहिली आहे. BGP म्हणजेच बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल आहे. बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल संबंधी सांगायचे झाल्यास हे इंटरनेटचे रुटिंग प्रोटोकॉल असते. हे इंटरनेट ट्रॅफिक डिलीवर करण्यासाठी वेगवेगळ्या रुट्सचा वापर करतात. क्लाउड फेयरचे सीनियर उपाध्यक्ष यांच्या माहितीनुसार, फेसबुकचे बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल फेसबुकसाठी इंटरनेट ट्रॅ्फिक डिलीवर करण्यासाठी बेस्ट रूट तयार करते. हे बीजीपी इंटरनेट वरून हटवण्यात आले होते. परंतु, असे का झाले यासंबंधी अजून काही माहिती समोर आली नाही.

​काय आहे DNS

-डीएनएस

DNS संबंधी माहिती अशी की, याला इंटरनेटचे बॅकबोन प्रमाणे समजले जाते. खरं म्हणजे, आपल्या कम्प्यूटर मध्ये कोणतीही वेबसाइट ओपन करतो त्यावेळी डीएनएस आपल्या ब्राउजरला हे सांगत असतो की, कोणत्याही वेबसाइटचा आयपी काय आहे. प्रत्येक वेबसाइटचा स्वतःचा आयपी असतो. फेसबुक प्रकरणात डीएनएस तुमच्या ब्राउजरची माहिती देतो. फेसबुकचा आयपी काय आहे. फेसबुकचा रेकॉर्ड जर डीएनएस वरून गायब होत असेल तर तुमच्या कम्प्यूटरला हे माहिती पडणार नाही की, फेसबुक काय आहे, तसेच याचे अॅक्सेस काय आहे.

​मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका

जगभरात सोमवारी अचानक फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअॅपची सेवा ठप्प झाली होती. यात अनेक युजर्संना संकटाचा सामना करावा लागला. काही तासांपर्यंत ही सेवा ठप्प होती. परंतु, याचा मार्क झुकरबर्ग यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. फेसबुकचे को फाउंडर आणि सीईओ झुकरबर्ग यांच्या नेटवर्थमध्ये ७ अब्ज डॉलर जवळपास ५२,१८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अब्जावधीच्या लीस्टमधून (World’s Richest People) ते एक पायरी खाली घसरले आहे.

​Facebook, Whatsapp, Instagram पुन्हा सुरू

Facebook-whatsapp-instagram-

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हाट्सअॅप, इंस्टाग्राम आणि मेसेंजरची सेवा पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली आहे. भारतात काल साधारणपणे सव्वा नऊच्या सुमारास या तिन्ही सर्विस अचानकपणे बंद पडल्याने एकच गोंधळ उडाला होता. व्हाट्सअॅपवरून कोणताही मेसेज पाठवला जात नव्हता. तसेच कोणताही मेसेज येत नव्हता. फेसबुकवर सुद्धा पोस्ट जात नव्हती. या तिन्ही सर्विस डाउन झाल्याने लाखो कोट्यवधी लोकांना याचा त्रास सहन करावा लागला होता. रात्री उशिराने या तिन्ही सर्विस सुरू झाल्या. फेसबुकने लोकांचे आभार मानले आहे. फेसबुकचे चीफ टेक्नोलॉजीचे अधिकारी माइक श्रोएफर यांनी ट्विटरवरून लोकांची माफी मागितली आहे.

​कंपनीकडून आले स्पष्टीकरण

जगभरात तब्बल ६ ते ७ तास सर्विस बंद राहिल्यानंतर कंपनीने यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकने म्हटले की, आजच्या या असुविधेसाठी आम्हाला खेद वाटतो. आम्हाला माहिती आहे की, लोकांसोबत कनेक्ट राहण्यासाठी आमच्या सर्विसवर किती विश्वास आहे. याआधी ट्विटरवर व्हाट्सअॅपने सांगितले की, लोक आज व्हाट्सअॅपला युज करू शकत नव्हते. त्याबद्दल आम्ही माफी मागतो. कंपनीने ट्विट मध्ये सांगितले की, व्हाट्सअॅप आता यासाठी पूर्णपणे काम करीत आहे. या काळात ज्यांना ज्यांना अडचणीला सामोरे जावे लागले त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. भारतीय वेळेनुसार, सव्वा नऊच्या सुमारास फेसबुक, इंस्टाग्राम, आणि व्हाट्सअॅपची सेवा खंडीत झाली होती. परंतु, आता पूर्वपदावर आली आहे.

फेसबुकचे प्रत्येक मिनिटाला १.६ कोटीचे नुकसान

Facebook, WhatsApp आणि Instagram ची सर्विस सोमवारी रात्री अचानक ठप्प झाली होती. जवळपास ६ ते ७ तास ही सर्विस बंद होती. यामुळे कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यांना जवळपास ५२ हजार कोटी रुपयाचे नुकसान सोसावे लागले आहे. Standard Media Index च्या माहितीनुसार, कंपनीला अमेरिकेत ५,४५,०० डॉलर प्रति तास अॅड रिव्हेन्यूचे नुकसान झाले आहे. Fortune आणि Snopes च्या माहितीनुसार, कंपनीला अब्जोवधीचे नुकसान झाले आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, फेसबुक जवळपास रोज ३१९ मिलियन डॉलर रोज कमावतो. म्हणजेच प्रत्येक तासाला १३.३ मिलियन डॉलर अॅडमधून कमावतो. प्रत्येक मिनिटाला २,२०,००० डॉलर आणि ३७०० डॉलर प्रत्येक सेकंदाला कमावतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here