Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सध्या स्मार्टफोन खरेदीवर उत्तम डील्स देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ६४ एमपी कॅमेरा असलेला फोन खरेदी करायचा असेल तर स्मार्टफोन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे कारण, अमेझॉन सेलमध्ये अनेक उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामुळे ६४ MP कॅमेराने परिपूर्ण स्मार्टफोन तुम्ही अतिशय स्वस्तात खरेदी करू शकाल. आजच्या काळात सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे फोन कॅमेऱ्याचे महत्त्व वाढले आहे. विशेष म्हणजे , आजकाल मोबाईल कॅमेरामध्येच मस्त कॅमेरे असतात. ज्यामुळे इतर कॅमेराची गरज भासत नाही. आज आम्ही तुम्हाला ६४ मेगापिक्सेल कॅमेरा घेऊन येणाऱ्या अशाच काही फोनबद्दल सांगणार आहोत. या स्मार्टफोनची किंमत तुमच्या बजेटमध्येच आहे. यात Realme, Redmi, iQOO Z3 5G सारख्या अनेक नामांकित स्मार्टफोन्सचा समावेश आहे. पाहा डिटेल्स.

Mi 10i 5G

mi-10i-5g

किंमत – २४,९९९ रुपये

डील प्राईस -२१,९९९ रुपये

Mi 10i 5G स्मार्टफोन १२ टक्के सूटवर खरेदी केला जाऊ शकतो. हा हँडसेट MIUI १२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Mi 10i स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा १०८ MP आहे. याशिवाय ८ एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ एमपी मॅक्रो लेन्स आणि २ एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच, फोनच्या समोर १६ एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो नाईट मोड १.०, एआय पोर्ट्रेट मोड आणि एआय ब्यूटीफाईसारख्या फीचर्सला सपोर्ट करतो.

Redmi Note 10 Pro Max

redmi-note-10-pro-max

किंमत – २२,९९९ रुपये

डील प्राईस – १८,९९९ रुपये

Redmi Note 10 Pro Max च्या खरेदीवर १७ टक्के सूट दिली जात आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 G प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे आणि हा अँड्रॉइड ११ आधारित MIUI १२ ला सपोर्ट करेल. प्रो मॅक्सच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा १०८ MP आहे. याशिवाय ८ MP अल्ट्रा वाइड अँगल, ५ MP सुपर मॅक्रो लेन्स आणि २ MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी २० एमपीचा लेन्स देण्यात आला आहे. buy these top 64 mp camera smartphones with huge discounts in Amazon Sale read details

रेडमी नोट 10 प्रो

redmi-note-10-pro

किंमत – १९,९९९ रुपये

डील प्राईस – १६,९९९ रुपये

Redmi Note 10 प्रोच्या खरेदीवर १५ टक्के सूट दिली जात आहे. रेडमी नोट 10 प्रोच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा ६४ MP आहे. याशिवाय ८ MP अल्ट्रा वाइड अँगल, ५ MP सुपर मॅक्रो लेन्स आणि २ MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी २० एमपीचा लेन्स देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये ५०१० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

iQoo Z3 5G

iqoo-z3-5g

किंमत -२९,९९९ रुपये

डील प्राईस – १७,९९० रुपये

IQOO Z3 5G च्या खरेदीवर २२ टक्के सूट दिली जात आहे. IQOO Z3 5G १८० Hz टच सॅम्पलिंग रेट, FHD+ पॅनलसह ६.५ इंच १२० Hz पॅनल, ५५ W फास्ट चार्जिंगसह येतो. IQOO Z3 5G मध्ये ६४ MP कॅमेरा, १२० Hz स्क्रीनसह आहे iQOO Z3 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G द्वारे समर्थित आहे. IQOO Z3 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. युजर्ससाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

रेडमी नोट 10 एस

redmi-note-10-s

किंमत – १६,९९९ रुपये

डील प्राईस – १२,९९९ रुपये

अॅमेझॉन सेलमध्ये Redmi Note 10 s खरेदीवर २९ टक्के सूट दिली जात आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड ११ आधारित MIUI १२.५ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच फुल HD प्लस AMOLED डिस्प्ले आहे. रेड्मी नोट 10S मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ६४ MP प्रायमरी सेंसर, ८ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ MP मॅक्रो लेन्स आणि २ MP डेप्थ सेन्सर आहे. तर सेल्फीसाठी फोनच्या समोर १३ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५,००० mAh ची बॅटरी आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here