Amazon वर Great Indian Festival सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप्ससह अनेक प्रोडक्ट्स स्वस्तात उपलब्ध आहे. या सेलमध्ये तुम्ही कमी किंमतीत शानदार टॅबलेट्स खरेदी करू शकता. ऑनलाइन क्लासेस आणि वर्क फ्रॉम होमच्या काळात टॅबलेट असणे महत्त्वाचे झाले आहे. टॅबलेटद्वारे तुम्ही स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर अशी दोन्हींची कामे करू शकता. टॅबलेटमध्ये यूजर्सला टच स्क्रीन डिस्प्ले, कनेक्टिव्हिटी पर्याय आणि रिचार्जेबल बॅटरी मिळते. तुम्ही जर नवीन टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सेलमध्ये तुमची हजारो रुपयांची बचत होईल. सेलमध्ये अनेक ब्रँडेड टॅबलेट्सवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळेल. Amazon वरुन तुम्ही Samsung Galaxy Tab A7, Lenovo Tab M10, Panasonic Tab 8, Lenovo Yoga Smart आणि Samsung Galaxy Tab A7 Lite ला स्वस्तात खरेदी करू शकता. या टॅबलेट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 7

सॅमसंग-गॅलेक्सी-टॅब-ए 7

Samsung Galaxy Tab A7 ला सेलमध्ये तुम्ही १५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याची मूळ किंमत २०,९९९ रुपये आहे. टॅबलेटला ७५३ रुपयांच्या ईएमआयवर देखील खरेदीची संधी आहे. याशिवाय १३,५५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. सॅमसंगच्या या टॅबलेटमध्ये १०.४ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २०००x१२०० पिक्सल आहे. यात क्वाड स्टीरियो साउंड प्रदान करणारे स्पीकर दिले आहे. टॅबमध्ये Qualcomm Snapdragon ६६२ प्रोसेसरसह ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. यामध्ये रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तसेच, ७०४० एमएएचची बॅटरी दिली आहे.

लेनोवो टॅब एम 10

lenovo-tab-m10

या टॅबलेटची किंमत ३० हजार रुपये असून, सेलमध्ये १६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय ८९४ रुपये ईएमआय आणि १२,५५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील यावर मिळते. टॅबमध्ये १०.३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १९२०x१२०० पिक्सल आहे. टॅबलेट Android v९ Pie वर काम करतो. यात १.८GHz MediaTek Helio P२२T Tab प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची बॅटरी मिळते. टॅबमध्ये रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

पॅनासोनिक टॅब 8

पॅनासोनिक-टॅब -8

१४,९९९ रुपयांच्या Panasonic Tab 8 ला फक्त १०,९९९ रुपयात खरेदीची संधी आहे. टॅबलेटला ५१८ रुपये दरमहिना देऊन घरी नेऊ शकता. याशिवाय १३,५५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. यात ८ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२८०x८०० पिक्सल आहे. टॅबलेट Android v९ Pie ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात Mediatek २.०GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरसह ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. यामध्ये रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तर पॉवरसाठी ५१०० एमएचची बॅटरी दिली आहे.

लेनोवो योग स्मार्ट

लेनोवो-योग-स्मार्ट

Lenovo Yoga Smart सेलमध्ये १९,९९९ रुपयात मिळत आहे. याची मूळ किंमत ३५,५०० रुपये आहे. लेनोवोच्या या टॅबलेटला तुम्ही ९४१ रुपये देऊन ईएमआयवर खरेदी करू शकता. यावर १३,५५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. टॅबलेटमध्ये १०.१ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२८०x१२०० पिक्सल आहे. टॅब Android v९Pie ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ४३९ प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. यात ८ मेगापिक्सल रियर आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. टॅबलेटमध्ये ७००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 7 लाइट

सॅमसंग-गॅलेक्सी-टॅब-ए 7-लाइट

Samsung Galaxy Tab A7 Lite ला १४,५०० रुपयांऐवजी ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. टॅबलेट ५६५ रुपयांच्या ईएमआयवर देखील उपलब्ध आहे. यावर १०,९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. टॅबमध्ये ८.७ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १३४०x८०० पिक्सल आहे. टॅब अँड्राइड ११ वर काम करतो. यामध्ये क्वाड कोर ‎MediaTek MT८७६८T प्रोसेसरसोबत ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. यात रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ५१०० एमएएचची बॅटरी मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here