भारतात एकामागोमाग एक सणांना सुरुवात झाली आहे. आजपासून नवरात्रीचा उत्सव सुरू झाला असून, त्यापाठोपाठ काही दिवसातच दिवाळी आहे. तुम्ही जर हा सणांचा काळ खास बनविण्यासाठी स्मार्टफोन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर सेलच्या आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर्स मिळत आहे. मात्र, तुम्ही जर खास Vivo चा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची हजारो रुपयांची बचत होईल. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने विवो आपल्या स्मार्टफोन्सवर बंपर डील्स आणि ऑफर्स देत आहे. कंपनीच्या Vivo X70 सीरिज, Vivo Y73, Vivo Y33s आणि Vivo V21 सीरिजवर मोठी सूट दिली जात आहे. डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर सर्व ऑफलाइन रिटेल पार्टनर्ससाठी उपलब्ध आहे. या फेस्टिव्ह ऑफरचा १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत लाभ घेता येईल.

​१०१ रुपयात खरेदी करता येईल विवोचा फोन

फेस्टिव्ह ऑफर दरम्यान विवो अनेक शानदार ऑफर्स देत आहे. ग्राहक बजाज फायनान्स कार्डचा उपयोग करुन फक्त १०१ रुपयात विवोचा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. याशिवाय आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचडीबी फायनान्सचा उपयोग केल्यास १० टक्के कॅशबॅक मिळेल. कॅशबॅक ऑफर क्रेडिट कार्डवरून खरेदी आणि ईएमआय ट्रांजॅक्शनवर उपलब्ध आहे.

१० हजार रुपयांचे जिओ बेनिफिट्स

याशिवाय नो-कॉस्ट ईएमआय, वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि Vivo Y73, Vivo Y33s, Vivo V21 सीरिजवर १० हजार रुपयांचे जिओ बेनिफिट्स मिळतील. Vivo X70 आणि V21 series वर ५ हजार रुपये कॅशबॅक मिळेल.

​Vivo X70 series: किंमत आणि ऑफर

vivo-x70- मालिका-

कंपनीने ZEISS टेक्नोलॉजी आणि स्नॅपड्रॅगन ८८८+ ५जी प्रोसेसरसह Vivo X70 फ्लॅगशिप सीरिजला लाँच केले होते. यातील Vivo X70 Pro मीडियाटेक डाइमेंसिटी १२०० चिप, Vivo X70 Pro Plus स्नॅपड्रॅगन ८८८+ सोबत येतो. X70 Pro च्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ४६,९९० रुपये, १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ५२,९९० रुपये आहे. Vivo X70 Pro Plus च्या १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ७९,९९० रुपये आहे.

कंपनी Vivo X70 Series वर होम क्रेडिट झिरो प्रोसेसिंग फी ऑफर करत आहे. सर्व फायनान्स पार्टनर्ससह १५,००० रुपयांपेक्षा अधिकच्या मॉडेलवर झिरो डाउन पेमेंट आहे. फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस डेबिट कार्डवर फ्लॅट ३ हजार रुपये सूट मिळेल.

​Vivo X60 series: किंमत आण ऑफर

vivo-x60- मालिका-

Vivo X60 series मध्ये Vivo X60, X60 Pro आणि X60 Pro Plus चा समावेश आहे. Vivo X60 आणि X60 Pro स्नॅपड्रॅगन ८७०, ६.५६-इंच डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. X60 Pro Plus मध्ये स्नॅपड्रॅगन ८८८, ६.५६-इंच डिस्प्ले आणि क्वाड-कॅमेरा सेटअप मिळतो.

Vivo X60 च्या ८GB + १२८GB व्हेरिएंटची किंमत ३४,९९० रुपये, १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३९,९९० रुपये आहे. Vivo X60 Pro च्या १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९,९९० रुपये आहे. Vivo X60 Pro Plus च्या १२ जीबी +२५६ जीबी व्हेरिएंटला ६९,९९० रुपयात खरेदी करू शकता.

एचडीबी फायनान्सद्वारे Vivo X60 च्या खरेदीवर २,५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. सर्व फायनान्स पार्टनर्ससह १५ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या मॉडेलवर झिरो डाउन पेमेंट उपलब्ध होईल. फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट मिळेल.

​Vivo V21 आणि Vivo V21e: किंमत-ऑफर

vivo-v21-vivo-v21e-

Vivo V21 मीडियाटेक डायमेंसिटी ८००U, ६.४४-इंच डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २९,९९० रुपये, ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३२,९९० रुपये आहे. Vivo V21e मीडियाटेक डायमेंसिटी ७००, ६.४४ इंच डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलला २४,९९० रुपयात खरेदी करू शकता.

Vivo V21 आणि V21e ला एचडीबी फायनान्सद्वारे खरेदीवर २,५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. बजाज फिनसर्व ट्रांजॅक्शनवर ग्राहकांना ५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, झोमॅटो प्रो सबस्क्रिप्शन, ५ रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅकसह नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल.

​Vivo Y73 आ​णि Vivo Y33s: किंमत-ऑफर

जिवंत- y73- जिवंत- y33s-

Vivo Y73 स्मार्टफोन MediaTek Helio G९५, ६.४४ इंच आणि ट्रिपल कॅमरा सेटअपसह येतो. स्मार्टफोनच्या ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेजची किंमत २०,९९० रुपये आहे. Vivo Y33s फोन मीडियाटेक हीलियो जी८०, ६.५८ इंच डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. फोनच्या ८ जीबी +१२८ जीबी स्टोरेजची किंमत १७,९९० रुपये आहे.

Y73 च्या खरेदीवर पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशामध्ये TVS क्रेडिटसह ईएमआय कॅशबॅक मिळेल. इतर ग्राहकांना एचडीबी फायनान्ससह २,५०० रुपये कॅशबॅक आणि आयडीएफसी बँकेसह १,५०० रुपये कॅशबॅक मिळेल. विवो रिलायन्स जिओसोबत मिळून १० हजार रुपये आणि वाय सीरिजच्या अन्य स्मार्टफोन्सवर ७ हजार रुपयांचे फायदे देत आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here