इको डॉट (3 रा जनरल)

या स्मार्ट स्पीकरची किमत ४,४९९ रुपये आहे. मात्र सेलमध्ये फक्त १,९४९ रुपयात खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही घरातील इतर स्मार्ट डिव्हाइस कंट्रोल करू शकता. तसेच, म्यूझिक, कॉलला उत्तर देण्याची देखील सुविधा मिळते.
सारेगामा कारवां मिनी हिंदी 2.0- ब्लूटूथ/एफएम/एएम/ऑक्ससह म्युझिक प्लेयर
गाणी ऐकण्यासाठी सर्वोत्तम असलेल्या या डिव्हाइसमध्ये ३५१ प्री-लोडेड गाणी मिळतात. यात एफएम/एएम रेडिओ, ब्लूटूथ, यूएसबी आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक दिला आहे. सेलमध्ये याला २,०९० रुपयात खरेदी करू शकता.
Appleपल एअरटॅग
२,४९९ रुपयात उपलब्ध असलेल्या Apple AirTag चा वापर करून यूजर्स आयफोनमध्ये Find My app च्या मदतीने इतर डिव्हाइस शोधू शकतील. हे स्मार्ट ट्रॅकर एका टॅपवर आयफोन व आयपॅडशी कनेक्ट होते.
Xiaomi Mi Smart Band 6

शाओमीचा फिटनेस बँड सेलमध्ये ३,४९९ रुपयात उपलब्ध आहे. यात १.५६ इंच एमोलेड स्क्रीन, SpO२ ट्रॅकिंग, हार्ट रेट ट्रॅकिंग, स्ट्रेस आणि स्लीप मॉनिटरिंगची सुविधा मिळते. यात ३० स्पोर्ट्स मोड्स दिले असून, बँड वॉटरप्रूफ आहे.
इको डॉट (चौथा जनरल, ब्लू) घड्याळ + विप्रो 9 डब्ल्यू एलईडी स्मार्ट कलर बल्बसह
या स्मार्ट स्पीकर व इलेक्ट्रॉनिक बल्बला तुम्ही ४,१९९ रुपयात खरेदी करू शकता. स्मार्ट स्पीकरमध्ये Alexa सपोर्ट दिला असून, वेळ, टेम्प्रेचर आणि टाइमर्ससाठी एलईडी डिस्प्ले दिला आहे.
मी स्मार्ट बेडसाइड दिवा 2
या स्मार्ट लॅम्पला फक्त २,८९९ रुपयात खरेदी करता येईल. टच पॅनल सपोर्टसह येणाऱ्या या डिव्हासमध्ये Alexa आणि Google असिस्टेंटचा सपोर्ट मिळतो. डिव्हाइसला मोबाइल अॅपने कंट्रोल करता येईल.
पोर्ट्रॉनिक्स iLUMI, ब्लूटूथ स्पीकरसह पोर्टेबल एलईडी दिवा

या पोर्टेबल एलईडी लॅम्पची किंमत २,९९९ रुपये आहे, मात्र सेलमध्ये १,४९० रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये २,००० एमएएचची बॅटरी दिली आहे. यात कॉल्सला उत्तर देण्यासाठी बिल्ट-इन माइक दिला आहे. याशिवाय ३ वॉट स्पीकर देखील मिळतो.
वनप्लस स्मार्ट बँड
वनप्लसच्या या स्मार्ट बँडला तुम्ही १,८९९ रुपयात खरेदी करू शकता. यात १३ अॅक्टिव्हिटी मोड आणि SpO२ ट्रॅकिंग फीचर दिले आहे. बँड आयफोन आणि अँड्राइडशी कनेक्ट होते. धुळ व पाण्यापासून सुरक्षेसाठी आयपी ६८ रेटिंग मिळाले आहे.
ब्लूटूथ स्पीकर्ससह सौदीप इंडिया ट्रेडिंग कॉर्पोरेशन म्युझिकल पॉट
हा म्यूझिकल पॉट सेलमध्ये १,३१५ रुपयात उपलब्ध आहे. यात ७ कलर एलईडी लाइट आणि ब्लूटूथ स्पीकर दिला आहे. याशिवाय यामध्ये टच कंट्रोलची सुविधा मिळते व गाण्यासाठी फोन, टॅबलेटशी कनेक्ट करू शकता. यात नाइट मोड दिला असून, याद्वारे ३० मिनिटांनंतर डिव्हाइस बंद होते.
बेल्किन काकाओ आणि मित्रांची अधिकृत आवृत्ती 10W फास्ट वायरलेस चार्जिंग पॅड

या फास्ट वायरलेस चार्जिंग पॅडची किंमत १,७९९ रुपये आहे. याद्वारे आयफोन ७.५ वॉट आणि सॅमसंगच्या फोनला ८ वॉटवर चार्ज करू शकता. याशिवाय चार्जिंग होत असल्याचे दर्शवण्यासाठी एलईडी देखील आहे.
Realme Buds Q2 Active Noise Cancellation (ANC) in-Ear TWS Earphones
या इयरफोन्सला तुम्ही ग्रे आणि अॅक्टिव्ह ब्लॅक रंगात खरेदी करू शकता. यात Active Noise Cancellation फीचर दिले आहे. यात यूएसबी टाइप-सी चार्जिंग आणि ब्लूटूथ वी५.२ दिले आहे. तसेच, पेअरिंगसाठी गुगल फास्ट पेअर टेक्नोलॉजी मिळते. याची किंमत १,९९९ रुपये आहे
वनप्लस बुलेट वायरलेस झेड बास संस्करण
हे नेकबँड ब्लूटूथ वी५.० कनेक्टिव्हिटीसह येते. याची कनेक्टिव्हिटी रेंज १० मीटर आहे. पाणी व धुळीपासून सुरक्षेसाठी आयप५५ रेटिंग मिळते. डिव्हाइस Warp चार्जसोबत येते व याची बॅटरी १७ तास टिकते. नेकबँडला १,७९९ रुपयात खरेदी करू शकता.
Mi पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर

या डिव्हाइसला तुम्ही २,१९९ रुपयात खरेदी करू शकता. यात १६ वॉट साउंड आउटपूट देण्यात आला आहे. यात यूएसबी टाइप-सी चार्जिंग सपोर्ट मिळतो व याची बॅटरी १३ तास टिकते. स्पीकर वॉटरप्रूफ असून, ब्लॅक आणि ब्लू रंगात खरेदी करू शकता.
XERGY 3D रिमोट आणि टच कंट्रोल लाकडी स्टँड रिचार्जेबल बॅटरीसह ब्राइटनेस मून लॅम्प समायोजित करा
या मून लॅम्पची किंतम १,०९९ रुपये आहे. यात टच कंट्रोल सपोर्ट दिला आहे. याशिवाय, फ्लॅश, स्ट्रोब, फेड आणि स्मूथ असे लाइट मोड्स मिळतात. याशिवाय रिमोटने देखील कंट्रोल करता येईल.
Realme SmartWatch 2 Pro
सेलमध्ये रियलमीच्या स्मार्टवॉचला ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यात १.७५ इंच एचडी स्क्रीन दिली आहे. यात ९० स्पोर्ट्स मोड्स, हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंगची सुविधा मिळते. वॉचची बॅटरी १४ दिवस टिकते.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times