नवी दिल्ली : फोटो शेअरिंग अ‍ॅप आता फसवणुकीचा अड्डा झाला आहे. उत्तरप्रदेशमधील एका महिलेची इंस्टाग्रामद्वारे सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली आहे. तुम्ही देखील इंस्टाग्राम वापरत असाल तर सावध राहणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील एका महिलेची कथितरित्या एका व्यक्तीने ३२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या व्यक्तीशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती व तो ब्रिटनचा रहिवासी असल्याचे सांगत असे.

वाचा:

अधिकाऱ्यांनुसार, महिला सप्टेंबरमध्ये इंस्टाग्रामवरून त्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती. व्यक्तीने आपले नाव हॅरी असल्याचे सांगत ब्रिटनचा नागरिक असल्याची माहिती दिली. यानंतर सोशल मीडियावर नियमित चर्चेनंतर फोन नंबर्स एक्सचेंज केले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पीडितेला व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल आला. यात एक गिफ्ट बॉक्स आणि काही ब्रिटनचे चलन पाठवले असून, त्याची किंमत ४५ लाख रुपये आहे. ही भेटवस्तू घेण्यासाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागेल, असे सांगितले.’

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ऑनलाइन व अनेक टप्प्यात रक्कम देण्यास सांगितली. अशाप्रकारे ३२ लाख रुपये ट्रांसफर करण्यात आले व दुसरीकडून कोणतेही उत्तर आले नाही.’

यानंतर महिला ब्रिटनवरून पाठवण्यात आलेल्या भेटवस्तूची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोहचली. यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे समजले. अखेर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान, कुमार यांनी लोकांना आकर्षक ऑनलाइन ऑफर आणि बनावट योजनांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, अशा सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्यासाठी ज्यांच्यासोबत बोलत आहेत, त्यांच्याबाबत संपूर्ण माहिती घ्यावी.

दरम्यान, पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीचा रिपोर्ट करण्यासाठी मे महिन्यात १५५२६० हा हेल्पलाइन नंबर देखील जारी केला आहे. तसेच, लोक ११२ वर देखील कॉल करू शकतात.

वाचा:

वाचा:

वाचा:

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here