देश आणि जगभरातील अनेक टॉप ब्रँड्स भारतात दर आठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स सादर करत असतात. वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोन्समध्ये एकापेक्षा एक दमदार फीचर्स मिळतात. अगदी ८ हजार रुपयांपासून ते ३०-३५ हजार रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात अनेक दमदार फोन्स उपलब्ध आहे. या फोन्समध्ये पॉवरफुल बॅटरी, शानदार डिस्प्ले, कॅमेऱ्यासह अनेक सर्वोत्तम फीचर्स मिळतात. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला कमी किंमतीत Redmi 9 Power, Samsung Galaxy A03s, Tecno Pova 2, Redmi 9 Prime आणि Oppo A12G सारखे शानदार स्मार्टफोन्स मिळतील. या स्मार्टफोन्सला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. याशिवाय ऑफलाइन मार्केटमध्ये देखील हे फोन्स तुम्हाला मिळतील. या फोन्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मी Y12G जगतो

vivo-y12g

Vivo Y12G मध्ये ६.५१ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यात ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर रियरा १३+२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते. हा फोन अँड्राइड १० वर आधारित Funtouch OS ११ वर काम करतो. Glacier Blue आणि Phantom Black रंगात येणाऱ्या या फोनची किंमत १०,९९० रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए 03 एस

सॅमसंग-गॅलेक्सी-ए 03 एस

या फोनमध्ये ६.५० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. यात मीडियाटेक हीलियो पी३५ (एमटी६७६५) प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये रियरला १३+२+२ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. फोन अँड्राइड ११ आधारित One UI Core ३.१ वर काम करतो. फोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट रंगात उपलब्ध आहे. ५००० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत ११,४९९ रुपये आहे.

रेडमी 9 पॉवर

redmi-9-power

रेडमीच्या या फोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. यात ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ६६२ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तर रियरला ४८ + ८ +२+२ मेगापिक्सलटचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी मिळते. फोन अँड्राइड १० आधारित MIUI १२ काम करतो. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रुपये आहे.

रेडमी 9 प्राइम

redmi-9-prime

Redmi 9 Prime स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x2340 पिक्सल आहे. यात २ GHz ऑक्टा कोर MediaTek Helio G८० प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर रियरला १३ + ८ + ५ + २ मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. पॉवरसाठी ५०२० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड १० आधारित MIUI ११ वर काम करतो. या फोनची किंमत ९,९९९ रुपये आहे.

टेकनो पोवा 2

tecno-pova-2

टेक्नोच्या या फोनमध्ये ६.९० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४६० पिक्सल आहे. यात २GHz ऑक्टा कोर MediaTek Helio G८५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तर रियरला ४८+२+२ आणि एआय कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. यात ७००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड ११ आधारित HiOS वर काम करतो. हा फोन १०,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

आणखी व्हेरिएंट्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here