अनेक स्मार्टफोन कंपन्या भारतात एकापेक्षा एक शानदार स्मार्टफोन्स लाँच करत आहे. फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने ई-कॉमर्स वेबसाइट्स फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या प्राइस रेंजमधील स्मार्टफोन लाँच केले आहेत. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. शानदार डिस्प्ले, कॅमेरा, पॉवरफुल बॅटरी आणि प्रोसेसरसह अनेक फोन्स गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाले आहेत. गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या फोन्समध्ये Redmi note 10 lite, Motorola Edge 20 pro, Oppo A55, Vivo X70 Pro+ आणि Vivo X70 Pro चा समावेश आहे. या स्मार्टफोन्सला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि प्रमुख ऑफलाइन स्टोर्सवरुन खरेदी करू शकता. गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मोटोरोला एज 20 प्रो

मोटोरोला-एज-20-प्रो

Motorola edge 20 pro मध्ये ६.७० इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon ८७० प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्राइड ११ आधारित My UX वर काम करतो. यात रियरला १०८ + १६ + ८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. ४५०० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत ३६,९९९ रुपये आहे.

रेडमी नोट 10 लाइट

redmi-note-10-lite

Redmi note 10 lite मध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. यात २.३GHz ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ७२०G प्रोसेसर दिला आहे. डिव्हाइस अँड्राइड ११ आधारित MIUI वर काम करते. यात रियरला ४८ + ८ + ५ + २ मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. तर पॉवरसाठी ५०२० एमएएचची बॅटरी मिळते. फोनच्या ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये, ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आणि ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे.

Oppo A55

oppo-a55

या स्मार्टफोनमध्ये ६.५१ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Helio G३५ प्रोसेसर दिला असून, डिव्हाइस अँड्राइड ११ आधारित ColorOS ११.१ वर काम करतो. यात ५० + २ +२ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते. याच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,४९० रुपये, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,४९० रुपये आहे.

Vivo X70 Pro +

vivo-x70-pro

विवोच्या या फोनमध्ये ६.७८ इंचाचा FHD डिस्प्ले दिला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन १४४०x३२०० आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात १.८ GHz ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon ८८८+ प्रोसेसर दिला आहे. फोन अँड्राइड आधारित Funtouch OS १२ वर काम करतो. फोनमध्ये रियरला ४८ + ५० + १२ + ४ मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. ४५०० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत ७९,९९० रुपये आहे.

Vivo X70 Pro

vivo-x70-pro

Vivo X70 Pro मध्ये ६.५६ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२३७० पिक्सल आहे. यात ऑक्टा कोर MediaTek Dimensity १२०० प्रोसेसर सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, तर रियरला ५० + १२ + १२ + ८ मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी ४४५० एमएएचची बॅटरी मिळते. हा फोन अँड्राइड ११ आधारित Funtouch OS १२ वर काम करतो. फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४६,९९० रुपये, ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ४९,९९० रुपये, १२ जीबी + २५६ जीबी मॉडेलची कंमत ५२,९९० रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here